कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन तसेच बाजार पेठेची माहिती फक्त पुस्तकातून नव्हे तर कृतीतून शिकता यावी यासाठी विद्यालयाचे मध्ये आनंदी बाजार उपक्रम महत्वाचा असल्याचे प्रतिपादन शिरूर पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या कोमल सत्यनारायण ढेरंगे यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेरंगे वस्ती येथे आयोजित बालआनंद मेळावा अंतर्गत आनंदी बाजार उपक्रमाचे शुभारंभ प्रसंगी ढेरंगे बोलत होत्या. या आनंदी बाजारात विद्यालयातील तब्बल १३९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी माजी सरपंच संदीप ढेरंगे, माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, माजी सदस्या अंजली ढेरंगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सीता ढेरंगे, समितीचे उपाध्यक्ष गोरक्ष घावटे, तानाजी ढेरंगे, सागर ढेरंगे, श्रद्धा पटेकरी, म्हस्कू शिवले, दत्तात्रय शिवले, माजी चेअरमन पंडीत ढेरंगे, मनिषा ढेरंगे, पूजा चौधरी, पल्लवी इनामकर, सुमन राठोड, हनुमंत कांबळे तसेच ग्रामस्थ, पालक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमात सुमारे २५० पालकांनी आनंदी बाजार उपक्रमास भेट दिली व मुलांकडून भाजी, फळे, खाऊची खरेदी केली.
शाळेचे मुख्याध्यापक संभाजी डावखर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. सुनिल शेळके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या उपक्रमातून खरेदी – विक्री, नफा – तोटा, सामाजिक बांधिलकी या संकल्पना दृढ होण्यास मदत झाली. सर्व विद्यार्थी आनंदाने आपापल्या वस्तूंची विक्री होण्यासाठी प्रयत्न करत होते. खाऊ चौपाटी तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूपच आवडीचे बनली.

माता पालकांनी पिशव्या भरून बाजार केला. वडापाव, पॅटिस, सरबत, चहा, पराठे, आप्पे, इडली, पोहे याबरोबरच भेळ, फळे, भाजीपाला यांचेही स्टॉल होते. सुमारे ५४३२५/- रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांचा आनंद पाहून मनिषा शेळके, कविता जवळकर, अनिता ढमढेरे, सुमन तापकीर, मयुरी भांडवलकर, लता खांदवे यांनी समाधान व्यक्त केले.
रेशमा शेख यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.





