पेरणे-लोणीकंद गटातील जनभावनेचा आदर;आभार मेळाव्याला प्रचंड गर्दीने जनतेचा उत्स्फूर्द प्रतिसाद
लोणीकंद/पुणे : विजय लोखंडे
प्रदिप वसंत कंद यांनी गेल्या १५ वर्षांत विनापद या भागासाठी केलेले काम मोठे आहे. निवडणुकीतील जय-पराजय हा तांत्रिक असला, तरी लोकांच्या हृदयातील त्यांचे अढळ स्थान कायम आहे. पेरणे-लोणीकंद गटातील जनभावनेचा आदर करून प्रदिपभाऊ कंद यांना पुणे जिल्हा परिषद किंवा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन्मानाचे पद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल,” असे आश्वासन आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी येथे दिले.
पेरणे,लोणीकंद येथे आयोजित आभार मेळाव्यात प्रदिप वसंत कंद यांच्या पुनर्वसनाची मागणी पेरणे – लोणीकंद जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी व जनतेने आक्रमकपणे लावून धरली आहे.यावर बोलताना आमदार कटके यांनी कंद यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.या गटात ‘दुप्पट निधी देऊन न्याय देऊ’ 
आमदार माऊली कटके म्हणाले की, “अजितदादांच्या आकस्मिक जाण्याने आपण एका मोठ्या नेतृत्वाला मुकलो, ज्याचा परिणाम निवडणुकीवर झाला. मात्र,आता खचून न जाता लढण्याची वेळ आहे.या गटात धनशक्तीचा वापर करून जनशक्ती दडपण्याचा प्रयत्न झाला असला,तरी विकासकामांत आम्ही मागे हटणार नाही.जिल्हा परिषद सदस्याला मिळतो त्यापेक्षा दुप्पट निधी या १२ गावांना मिळवून देण्याची जबाबदारी माझी असेल.शिरूर-हवेलीत सर्वाधिक निधी लोणीकंद गटाला दिला जाईल.”

या भव्य मेळाव्याचे पेरणे – लोणीकंद गट परिसरातील राजकारणात नवीन ऊर्जा भरली असून, आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दिलेल्या शब्दामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.तसेच या मेळाव्याला मोठ्या प्रचंड गर्दीने कार्यालय भरून मोठा प्रतिसाद लाभला आहे.
याप्रसंगी लोणीकंद गणाच्या उमेदवार लोचन शिवले,पेरणे गणाच्या उमेदवार संगीता वाळके सह पेरणे – लोणीकंद झेडपी गटातील विविध पदाधिकारी,आजी,माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते





