- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणभोसरीत विश्वकर्मा जयंती महोत्सव व स्नेहमेळावा उत्साहात संपन्न - अध्यक्ष बाळासाहेब शेलार

भोसरीत विश्वकर्मा जयंती महोत्सव व स्नेहमेळावा उत्साहात संपन्न – अध्यक्ष बाळासाहेब शेलार

- Advertisement -spot_img

लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे लोहार उत्सव समिती पुणे जिल्ह्याच्या वतीने यशस्वी आयोजन
भोसरी/पुणे : विजय लोखंडे
पुणे, भोसरी येथे लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे लोहार उत्सव समिती पुणे जिल्हा यांच्या वतीने विश्वकर्मा जयंती महोत्सव व स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. यामध्ये गणेश महिला भजनी मंडळाचा विश्वकर्मा आराधना कार्यक्रम, प्रभू विश्वकर्मांची महाआरती, दीपप्रज्वलन, पुरस्कार सोहळा, विश्वकर्मा एंटरटेनमेंट प्रस्तुत कलाकार आपल्यातला हा मनोरंजनात्मक गाण्यांचा कार्यक्रम, महाप्रसाद, रक्तदान शिबीर, खेळ पैठणीचा कार्यक्रम, लकी ड्रॉ,अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी दिली.


या स्नेहमेळाव्याच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड मनपाचे नवनिर्वाचित नगरसेवक निलेश बोराटे,निखिल बोऱ्हाडे,नगरसेविका अर्चना सस्ते,रेखा देवकर,नगरसेवक डॉ.सुहास कांबळे उपस्थित होते.तसेच लोहार समाजातील पुंडलिक सूर्यवंशी,निलेश पवार,विलास आव्हाड,दिलीप वसव,राजाराम कळसे,जेष्ठ समाजसेवक जगन शंकर लोखंडे,पत्रकार विजयराव लोखंडे,सोमनाथ तुकाराम लोखंडे,महेंद्र लोखंडे,गणेश लोखंडे,मनोज लोखंडे आदी मान्यवर व लोहार समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी सकाळच्या सत्रात गणेश महिला भजनी मंडळाच्या विश्वकर्मा आराधनाने कार्यक्रमाचे सुरूवात झाली.त्यानंतर गितांजली व अमित पवार,डॉ निलम व डॉ राहुल चव्हाण,भाग्यश्री व नवनाथ थोरात,रेखा व प्रभाकर चव्हाण या मानकऱ्यांच्या हस्ते प्रभू विश्वकर्मांची महाआरती पार पडली.सकाळच्या सत्राचे सूत्रसंचालन माधुरी लोहार यांनी केले.
त्यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुरस्कार वितरण कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविक उत्सव समितीचे सचिव डॉ.रामदास लाड यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी संस्थेचा आलेख मांडला तसेच दिवसभराच्या कार्यक्रमाचे स्वरूप मान्यवरांच्या समोर मांडले.तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यातील शिवनारायण पोपळकर यांना रोख रु ५००१, ट्रॉफी,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ असे स्वरूप असलेला जीवनगौरव पुरस्काराने यवतमाळ येथील योगिता गुजर यांना कलारत्न पुरस्कार,जळगाव येथील अनिल लोहार यांना ज्ञानज्योती पुरस्कार,तर सोलापूर जिल्ह्यातील प्रल्हाद नवघन यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये पुरस्काराचे मानपत्र लेखन व वाचन डॉ.रामदास लाड यांनी केले.
लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेच्या पुढील ध्येय धोरणांचा आढावा घेत उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
दुपारच्या सत्रात विश्वकर्मा एंटरटेनमेंट प्रस्तुत कलाकार आपल्यातला हा मनोरंजनात्मक गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये विश्वकर्मा एंटरटेनमेंटचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार,उपाध्यक्ष राजश्री हरिहर,निर्देशक वसंत पोपळघट यांचे बहुमोल असे सहकार्य लाभले.कलाकार आपल्यातला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना सुर्यवंशी व मनिषा भालके यांनी केले.यावेळी महाप्रसादाचे आयोजन उत्सव समितीचे अध्यक्ष दत्तात्रय लोहार, उपाध्यक्ष संतोष रणसिंग,शाम पखाले यांनी केले.
सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत संपर्क प्रमुख गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ.रामदास लाड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे अथक परिश्रम
लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार,उत्सव समिती अध्यक्ष दत्ता लोहार,उपाध्यक्ष औदुंबर कळसाईत,गोरक्षनाथ चव्हाण कार्याध्यक्ष संजीव दाते,सहकार्याध्यक्ष भारती शेलार,खजिनदार महेश हरिहर,सहखजिनदार रणजीत माने,प्रसिद्धी प्रमुख मनोज तुकाराम लोखंडे,संपर्क प्रमुख राजेंद्र हरेल,राजश्री हरिहर,सुलोचना आगळे,तसेच उद्योग समिती पुणे जिल्हा,भक्ती शक्ती महिला मंडळ,विश्वकर्मा एंटरटेनमेंट व ऐतिहासिक सहल समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले


खेळ पैठणीचा विजेत्या ठरल्या कोमल अमोल पवार
पुढील सत्रात “खेळ पैठणीचा” श्री औदुंबर कळसाईत यांनी सादर केला.यामध्ये भरघोस अशा बक्षिसांचे वाटप करण्यात आले.कोमल अमोल पवार या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाच्या विजेत्या ठरल्या.त्यांना प्रथम क्रमांकाची पैठणी आणि ३१” स्मार्ट टीव्ही बक्षीस म्हणून देण्यात आला.सुनील चव्हाण,तानाजी पवार,हेमंत शिरसाठ, अविराज भालके यांनी खेळ पैठणीसाठी विविध बक्षिसे दिली.
लकी ड्रॉ च्या विजेत्या ठरल्या शारदा राजेंद्र हरेल
सकाळी कार्यक्रमासाठी १० ते ११ या वेळेत उपस्थित असलेल्या समाज बांधव भगिनींना लकी ड्रॉ कुपनचे वाटप करण्यात आले होते त्याचा लकी ड्रॉ काढण्यात आला.यामध्ये शारदा राजेंद्र हरेल विजयी ठरले.लकी ड्रॉ साठी कैलाश कांबळे यांनी सुंदर देवघर बक्षीस दिले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page