कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
जनसेवेला प्रारंभ – विकास पर्वाला आरंभ हे घोषवाक्य घेऊन शिरूर पंचायत समितीच्या कोरेगाव भिमा सणसवाडी पंचायत समितीच्या गणातील अपक्ष उमेदवार कोमल सत्यनारायण ढेरंगे यांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली असून सर्वसामान्य लोकांचा आवाज म्हणून त्यांचेकडून मोठी आशा गणातील मतदार राजाकडून व्यक्त केली जात आहे.

एकीकडे पक्षाकडून उमेदवारीची आशा असताना अचानक त्यांना गणात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले. परंतु अशा स्थितीत ही आपण समाजासाठी केलेली कामे आणि भविष्यात करणाऱ्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. नियोजन बद्ध प्रचार यंत्रणा राबविण्यात आल्याने कमी कालावधीत जास्तीत जास्त मतदारांचे पर्यंत कोमल ढेरंगे पोहचल्या असून अपक्ष उमेदवार कोरेगाव भिमा वाडा पुनर्वसन सणसवाडी पंचायत समितीच्या गणात इतिहास घडविण्यास तयार आहेत.

कोरेगाव भिमा परिसरातील वाड्या वस्त्यांवरील तसेच विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्या भागातील सोडविण्याचे वचन ढेरंगे यांचे कडून नागरिकांना देण्यात येत आहे.

महिला बचत गटाच्या माध्यमातून कोमल ढेरंगे यांचा महिला वर्गाशी आधीपासूनच मोठा जनसंपर्क आहे. तसेच त्याचे पती सत्यनारायण ढेरंगे यांचे देखील सार्वजनिक कामात मोठे योगदान आहे. ही निवडणूक पहिल्यांदाच अपक्ष म्हणून लढणाऱ्या कोमल ढेरंगे यांनी मोठी प्रतिष्ठेची बनवली असून त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

कोरेगाव भिमा – वाडा पुनर्वसन – सणसवाडी येथे देखील ढेरंगे यांचे कडून प्रचाराचा धडाका लावला असून या भागातील जनता देखील कोमल ढेरंगे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे.





