- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव सणसवाडी गणात तसेच सणसवाडी शिक्रापूर गटातील राष्ट्रवादी च्या उमेदवारांसाठी महिला वर्ग...

कोरेगाव सणसवाडी गणात तसेच सणसवाडी शिक्रापूर गटातील राष्ट्रवादी च्या उमेदवारांसाठी महिला वर्ग प्रचाराच्या रिंगणात

- Advertisement -spot_img

कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा वाडा पुनर्वसन तसेच सणसवाडी पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार मनीषा संपत गव्हाणे यांच्या तसेच जिल्हा परिषद च्या मोनिका हरगुडे यांच्या प्रचारार्थ महिलावर्ग मोठ्या संख्येने गणात/गटात फिरत असून ही निवडणूक महिलांनी स्वतःच्या हातात घेतली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मनीषा गव्हाणे तसेच जिल्हा परिषद च्या उमेदवार मोनिका हरगुडे यांचा विजय निश्चित मानण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मित निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी गटातील प्रचार अत्यंत साधेपणाने करत असून या गटातील आणि गणातील नागरिकांशी संपर्क साधण्यावर उमेदवाराकडून भर दिला जात आहे.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल करण्याबरोबरच या भागातील नागरिकांना उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्रचारा दरम्यान मनीषा गव्हाणे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पिण्याचे शुद्ध पाणी, महिला सक्षमीकरण, महिला उद्योग तसेच बचत गटांच्या माध्यमातून भविष्यात विविध शासकीय योजना राबविण्यात येणार असल्याचे यावेळी मनीषा गव्हाणे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत यावर्षी नव्याने पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवक युवती देखील मोठ्या संख्येने प्रचारास सहभागी झाल्या असून शैक्षणिक दृष्ट्या कामे करावीत अशी मागणी देखील नवीन मतदारांकडून उमेदवारांकडे करण्यात येत आहे.
मनीषा गव्हाणे तसेच मोनिका हरगुडे यांचा पहिल्यापासून असलेल्या जनसंपर्क या निवडणुकीत त्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page