कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
पुणे जिल्हा परिषद आणि शिरूर पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचारात मोठी आघाडी घेतली असून राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणाचे सर्वच उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्या ची जोरदार चर्चा या गट व गणातील मतदारांमध्ये रंगत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार मोनिका नवनाथ हरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस सणसवाडी कोरेगाव भिमा पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार मनिषा संपत गव्हाणे यांच्या प्रचाराला जनसामान्यांचा, सर्व स्तरावर तर विशेषतः तरुणाईचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
शिक्रापूर – सणसवाडी गटात राष्ट्रवादीची मोठी घोडदौड सुरू असून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार मोनिका नवनाथ हरगुडे व राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार मनिषा संपत गव्हाणे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व गट व गणातील मतदार राजाचा भक्कम पाठिंबा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी जीव ओतून प्रचार करत आहेत.

मोनिका नवनाथ हरगुडे यांच्या कार्याची आपुलकी, मनिषा संपत गव्हाणे यांचा कामांचा अनुभव मतदारांच्या तीन पिढ्यांचे असलेले नाते, मोनिका हरगुडे व मनिषा गव्हाणे यांचे पती नवनाथ हरगुडे व संपत गव्हाणे यांचा शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव भीमा गट व गण परिसरात असलेला दांडगा जनसंपर्क केलेली विधायक कामे तसेच या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मिळत असलेली युवा, तरुणाईची साथ, महिला भगिनींनी साथ, सर्व स्तरावर पाठींबा त्यामुळे मोनिका नवनाथ हरगुडे व मनिषा संपत गव्हाणे या जिल्हा परिषद गटात व गणात सरस विजयी दावेदार पदाच्या जड उमेदवार ठरत आहे.
प्रचारासाठी महिला वर्ग मैदानात
या गटात आणि गणात दोन्ही महिला उमेदवार असल्याने आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी महिला वर्ग मोठ्या संखेने निवडणुकीच्या आखाड्यात उतरला असून वाड्या वस्त्यांवर तसेच गावातील प्रत्येक घरात जाऊन प्रचार करत आहेत. यामध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा टक्का जास्त आहे. वास्तविक मोनिका हरगुडे या पंचायत समितीच्या सभापती राहिल्या आहेत तर मनिषा गव्हाणे या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत त्यामुळे त्यांची नाळ आधीपासून सर्वसामान्य लोकांशी जोडलेली आहे. त्यामुळे महिला वर्ग चमत्कार करतील हे नक्की.





