- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणराष्ट्रवादी चे उमेदवारांची उद्या दि. ५ रोजी कोरेगाव भिमा सणसवाडी गणात प्रचार...

राष्ट्रवादी चे उमेदवारांची उद्या दि. ५ रोजी कोरेगाव भिमा सणसवाडी गणात प्रचार रॅली

- Advertisement -spot_img

कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोरेगाव भिमा सणसवाडी शिक्रापूर गटातील जिल्हा परिषद च्या उमेदवार मोनिका नवनाथ हरगुडे तसेच कोरेगाव भिमा वाडा पुनर्वसन सणसवाडी पंचायत समिती गणातील उमेदवार मनिषा संपत गव्हाणे यांच्या प्रचारार्थ दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रचार रॅली निघणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रचार रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी च्या दोन्ही उमेदवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता कोरेगाव भिमा येथील श्री भैरवनाथ मंदिर परिसरातून प्रचार रॅलीला सुरुवात होणार असून प्रदक्षिणा मार्गाच्या गावातील प्रमुख चौकातून रॅली पुढे जाणार आहे. त्याच बरोबर डिंग्रजवाडी फाटा, वाडा फाटा येथून रॅली वाडा पुनर्वसन गावातून पुढे सणसवाडी चे दिशेने मार्गक्रमण करणार असून या माध्यमातून राष्ट्रवादीच्या उमेदवार मोनिका हरगुडे आणि मनिषा गव्हाणे मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहे.


या प्रचार रॅलीचे माध्यमातून जिल्हा परिषद गटात तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून भविष्यात करण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती तसेच दोन्ही उमेदवार करण्यात येणाऱ्या कामांची माहिती मतदारांना देणार आहात.
तसेच या प्रचार रॅलीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page