कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा-सणसवाडी (शिरुर) पंचायत समिती गटातील सर्वसामान्य , कष्टकरी, शेतकरी आणि तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देणे हेच मुख्य ध्येय उराशी बाळगणाऱ्या कोरेगाव भिमा-सणसवाडी-वाडागाव पंचायत समिती गणाचे अपक्ष उमेदवार कोमलताई ढेरंगे यांनी विरोधी उमेदवारांचे पुढे मोठे आव्हान उभे केले असून सध्या स्थितीत कोमल ढेरंगे यांचे पारडे जड झाल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.

तर विकासकामे व समाज सेवेच्या दृष्टीकोनातून जनता कोमल ढेरंगे यांच्याकडे पाहत असून त्यांना सर्वत्र जाहीर पाठींबा व प्रतिसाद मिळू लागला असल्याने अपक्ष उमेदवार कोमल ढेरंगे यांचा विजय मोठ्या मताधिक्क्यांनी होईल अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

कोरेगाव भिमा-सणसवाडी-वाडागाव या प्रचार दौऱ्यात कोमल ढेरंगे यांनी मतदारांशी थेत संवाद साधण्यावर भर दिला असून प्रचारा दरम्यान सर्वत्र त्यांचे जंगी स्वागत देखील केले जात आहे. तर त्यांच्या प्रचाराला मतदारांकडून गती मिळत असून प्रत्येक गावागावत, वाड्यावस्त्यांवर, घराघरात, मनामनात कोमल ढेरंगे यांचे वारे वाहत असल्याचे स्पष्ट होत आहे.

कोमल ढेरंगे यांचा जनसंपर्क आणि नागरिकांच्या अडचणींशी असलेली आपुलकी यांचा विकास मोहिमेसाठी निर्णायक निर्णय ठरणार असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे.





