
कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
” धर्मवीर संभाजी महाराज की जय ” जय भवानी – जय शिवाजी ” हर हर महादेव “ च्या जयघोषात हवेली तालुक्यातील शौर्यपीठ श्रीक्षेत्र तुळापूर येथे येथे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व शेकडो शंभुभक्तांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती निमित्ताने समाधीस्थाळावर ग्रामपंचायत श्रीक्षेत्र तुळापूर व शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट, श्री क्षेत्र तुळापूर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराजांची सकाळी संयुक्तिक पूजा करण्यात आली. याप्रसंगी समाधी स्थळावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ग्रामपंचायत च्या विद्यमान सरपंच गुंफाताई इंगळे, उपसरपंच नवनाथ शिवले, शंभुराजे चॅरिटेबल चे अध्यक्ष शिवाजी शिवले, भाजपा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष अमोल शिवले, माजी उपसरपंच पवन खैरे, शंभुराजे चॅरिटेबल चे उपाध्यक्ष संजय शिवले माजी सरपंच माऊली शिवले, ग्रामपंचायत सदस्य राजाराम शिवले, सुरेखा शिवले, माजी उपसरपंच राहुल राऊत, माजी चेअरमन राजुनाना शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले, हनमंत शिवले, राजेंद्र शिवले, ज्ञानेश्वर इंगळे, प्रदिप शिवले, संतोष शिवले, शांताराम शिवले, खंडु शिवले, पांडुरंग शिवले, किसन पुजारी तसेच ट्रस्ट चे पदाधिकारी व सर्व संचालक, वर्षभर पूजेचे नियोजन करणारे शंभूभक्त, ग्रामस्थ व सर्व शंभूभक्त उपस्थित होते.





