कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
शिरूर पंचायत समितीच्या कोरेगाव भिमा सणसवाडी वाडा पुनर्वसन गणातील अपक्ष उमेदवार आणि कोरेगाव भिमा ग्रामपंचायत च्या माजी सदस्या मीना शिवाजी ढेरंगे या शिरूर पंचायत समिती साठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या असून नुकताच गावातील मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या या सक्रिय कार्यकर्त्या आहे. गणातील महिला वर्गामध्ये मीना ढेरंगे या लोकप्रिय असून सामाजिक, शैक्षणिक तसेच सार्वजनिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो.
ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांचे माध्यमातून विविध विकास कामे कोरेगाव भिमा परिसरात करण्यात आली आहे. या पंचायत समितीच्या निवडणुकीत मीना ढेरंगे या पहिल्यापासून निवडणूक लढविणारावर ठाम होत्या. परंतु त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला.

कोरेगाव भिमा, वाडा पुनर्वसन तसेच सणसवाडी या मोठ्या गावांचे बरोबरच वाड्या वस्त्यांवर तसेच घरोघरी जाऊन त्या प्रचार करत असून नागरिकांचा देखील त्यांना पाठिंबा मिळत आहे. तसेच भविष्यात या भागातील समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असणार असल्याचे अपक्ष उमेदवार मीना ढेरंगे यांनी सांगितले.





