कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा सणसवाडी पंचायत समितीच्या अपक्ष उमेदवार कोमल सत्यनारायण ढेरंगे यांनी गणात प्रचारासाठी मोठी रणनीती आखली असून वाहनाचे बरोबरच गावात तसेच वाड्या वस्त्यांवरील प्रत्येक घरात जाऊन कोमल ढेरंगे आणि त्याचे सहकारी प्रचार करत जोर धरला आहे. कोमल ढेरंगे यांना देखील जनमतात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या गणात पहायला मिळत आहे.

सामाजिक कार्याचा वसा घरातून मिळाला असल्याने त्या कुठेतरी समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महिला बचत गटातील महिलांना स्वतः च्या पायावर आर्थिक दृष्ट्या बसविण्यासाठी त्यांचा प्रयत्न असून महिला वर्ग मोठ्या आशेने त्याचे कडे पाहत आहे.

नुकताच त्यांचा प्रचाराचा नारळ कोरेगाव भिमा येथील श्री भैरवनाथ मंदिर, वाडा पुनर्वसन येथील श्रीराम मंदिर तसेच सणसवाडी येथील श्री भैरवनाथ मंदिरात मोठे शक्ती प्रदर्शन करत झाले.

गावोगावी महिलांच्या बैठका, घरभेटी, मतदारांशी थेट संवाद साधत महिलांनी प्रचाराची धुरा सांभाळली असून त्यामुळे कोमल ढेरंगे यांच्या प्रचाराला अधिक धार मिळत आहे. नाती-गोती तसेच पती सत्यनारायण ढेरंगे यांचा भक्कम पाठींबा आणि कोमल ढेरंगे यांनी आजवर नागरिकांची केलेली सेवा या जोरावर कोमल ढेरंगे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.





