कोरेगाव भिमा :
पूर्व हवेली तालुक्यात गेली १५ वर्ष -लोकांच्या सुख, दुःखात राहून समाजसेवा व लोकसेवा करीत अनेक विकासकामे मार्गी लावणारे व नागरिकांची सेवा करणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील सुज्ञ जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रदिपभाऊ वसंतराव कंद यांच्याकडे पाहत आहे.
या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे जोरदार वारे असून यावेळी या गटात एक नवा इतिहास घडून गटात राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रदिपभाऊ वसंत कंद यांच्या घड्याळाचा गजर वाजणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर या गटात दादांच्या सहानभूतीची मोठी लाट निर्माण झाली असून पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रदिपभाऊ वसंतराव कंद, लोणीकंद पंचायत समिती गणाच्या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार लोचन विजय शिवले, पेरणे पंचायत समिती गणाच्या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार संगिता जालिंदर वाळके यांच्या गटातील शांततेत प्रचाराला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे सध्या मतदारसंघात शोककळा असून, प्रदिपभाऊ वसंतराव कंद यांच्यासह पंचायत समितीच्या उमेदवार लोचन शिवले आणि संगिता वाळके यांचा प्रचार अत्यंत शांततेत आणि श्रद्धांजलीपर पद्धतीने सुरू आहे. अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती आणि कंद यांच्या कार्यामुळे मतदारसंघात ‘घड्याळाची’ मोठी लाट पाहायला मिळत आहे.
लोणीकंद पंचायत समितीचे उमेदवार लोचन विजय शिवले, तर पेरणे पंचायत समितीच्या उमेदवार संगिता जालिंदर वाळके सध्या या तिन्ही उमेदवारांच्या प्रचार दौऱ्याला गावोगावी ग्रामस्थांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून, ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर आणि अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करत जिंकण्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त होत आहे.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





