कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, वाडा पुनर्वसन, सणसवाडी गणात अपक्ष उमेदवार कोमल सत्यनारायण ढेरंगे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत कोरेगाव भिमा येथील श्री भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी गणातील शेकडो पदाधिकारी आणि ढेरंगे कुटुंबावर प्रेम करणारे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये युवा वर्गाचे बरोबरच महिला देखील मोठ्या संखेने सहभागी झाल्या होत्या.

मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, महिला बचत गटाच्या माध्यमातून कोमल ढेरंगे नागरिकांच्या संपर्कात होत्या. गटातील उज्जैन ट्रिप मध्ये देखील त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) या पक्षातील उमेदवारीसाठी त्या आग्रही होत्या. परंतु त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली नसल्याचे त्यांनी अखेर अपक्ष म्हणून या गणातील समस्या सोडविण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या.

या भागातील रस्ते, लाईट, पाणी, महिला आरोग्य, विद्यार्थिनी साठी आध्याधुनिक शिक्षण प्रणाली, डिजिटल शाळा, महिला स्वयं रोजगार, महिला बचत गटाचे माध्यमातून उद्योक आदी विषयांवर त्यांचे कडून प्रचार करण्यात येत असून याला मतदारांचा देखील वाढता पाठिंबा मिळत आहे.
श्री भैरवनाथ मंदिरात प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना कोमल ढेरंगे यांनी या भागातील विकासासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन मायबाप मतदार राजाला केले असून भविष्यात आपण या भागात विकासाची गंगा आणू असे आश्वासन कोमल ढेरंगे यांनी दिले.





