कविता विजय पायगुडे, कुशाल सातव, सूरज चौधरी यांच्या प्रचाराचा बोल्हाई चरणी शुभारंभ
कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
आम्ही यावेळी केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लोकांची कामे करणाऱ्या भाजपाकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी कविता विजय पायगुडे,पंचायत समितीची उमेदवारी कुशाल गोरख सातव,सूरज भालचंद्र चौधरी या व्यक्तींना दिली आहे. चांगल्या उमेदवारी देऊ शकलो,आज समाधान व आनंद असून चांगले आणि सक्षम उमेदवार आपल्या समोर आहे.त्यामुळे ताकदीने निवडणूक लढवा.
बोल्हाई मातेच्या प्रांगणात ज्यावेळी उमेदवारांची सभा होती ते उमेदवारच बोल्हाई मातेच्या साक्षीने निवडून येतात. यावेळी वाडेबोल्हाई गावाला जिल्हा परिषदेची उमेदवारी देत मोठी संधी मिळाली आहे. विजू पायगुडे सारखा काम करणारा सक्षम कार्यकर्ता आम्ही निवडून त्यांची पत्नी कविताताईना आम्ही उमेदवारी दिली. ९ हजार लोकांना स्वामी समर्थांचे दर्शन घडविणारा युवक कुशाल गोरख सातव असून गणात घरोघरी पोहोचणारा उमेदवार आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे स्वामी समर्थांना सह सर्वांचा आशिर्वाद कुशालला मिळाल्या शिवाय राहणार नाही. तर लोकांमध्ये राहणारा लोकांची कामे करणारा सूरज चौधरी हाही लोकांच्या घरघरात पोहोचलेला आहे. फक्त आता कमळ चिन्ह पुन्हा पुन्हा मतदारांपर्यंत पोहोचवा, विजय आपलाच आहे. इतिहासात पहिल्यांदा भाजपच्या माध्यमातून चांगली संधी मिळाली आहे. सर्वांनी एकत्रित ताकदीने येऊन तिन्ही ठिकाणी पॅनल टू पॅनल ! कमळ टू कमळ मतदान झाले पाहिजेत.केसनंद-कोरेगाव मूळ गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या तिन्ही उमेदवारांना मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन प्रदिपदादा कंद यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ सभेत बोलताना केले.
तर अजितदादांचे योगदान महाराष्ट्रासाठी मोठे राहिले आहे. दादांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकत नसल्याचे सांगून अजितदादा यांना प्रदीप कंद यांनी भर सभेत श्रध्दांजली वाहिली.

श्री क्षेत्र वाडेबोल्हाई येथे केसनंद – कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार कविता विजय पायगुडे, कुशाल गोरख सातव, सूरज भालचंद्र चौधरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आई बोल्हाई मातेच्या चरणी नारळ फोडून करण्यात आला. हा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक रोहिदास ऊंद्रे, भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पै.संदिपआप्पा भोंडवे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दादासाहेब सातव, वाडेबोल्हाई माजी सरपंच कुशाभाऊ गावडे, माजी सरपंच संजयराव भोरडे, केसनंदचे माजी सरपंच चंद्रकांत सातव, यशवंत कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, भाजपचे उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, पंचायत समितीचे माजी सदस्य शामराव गावडे, माजी सरपंच तथा बोल्हाई देवस्थान सल्लागार राजेंद्र चौधरी, वाडेबोल्हाई माजी आदर्श सरपंच दिपक गावडे, केसनंदचे माजी उपसरपंच पांडुरंग हरगुडे, युवा नेते प्रतापराव सातव, भाजपचे तालुकाध्यक्ष विजय जाचक, शिरसवडीचे उपसरपंच मंगेश गावडे, युवा नेते प्रदिप शिंदे, माजी उपसरपंच योगेश गायकवाड, मंगेश कानकाटे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विपुल शितोळे, माजी उपसरपंच सूरज भोरडे, माजी सरपंच सुजाता सावंत, ज्येष्ठ नेते विठठल गावडे, माजी सरपंच राजाराम सातव, माजी उपसरपंच हिरामण हरगुडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विपुल शितोळे, सांगवी सांडसचे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे, ज्येष्ठ नेते तुकाराम शिंदे, निळकंठ केसवड, माजी सरपंच वैशाली केसवड, प्रभारी सरपंच स्वाती इंगळे, राहुल शिंदे, सचिन कोतवाल आदी विविध गावचे आजी,माजी सरपंच,उपसरपंच व मोठ्या संख्येत मतदार उपस्थित होते.यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांना या सभेत सर्वांनी श्रध्दांजली वाहिली.





