कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार किरण संपत साकोरे तसेच पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून पेरणे फाटा येथील वाघमारे वस्तीतील नागरिकांशी संपर्क साधत प्रचार सुरू केला आहे.
या गटात पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विद्याधर कंद यांना मानणारा गट आहे. तसेच जिल्हा बँकेचे माध्यमातून तसेच भाजपच्या माध्यमातून या भागात केलेल्या कामाची माहिती मतदारांना देण्यात येत आहे. पेरणे लोणीकंद गटात भाजपकडून किरण साकोरे, मोनिका कंद तसेच राणी वाळके या पंचायत समितीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या भागातील रखडलेली रस्त्यांची कामे मध्यंतरी किरण साकोरे यांचे कडून करण्यात आली. एक युवा नेतृत्व म्हणून किरण साकोरे यांचे कडे पाहिले जात आहे.

या गटातील तसेच पेरणे पंचायत समिती गणातील उमेदवार राणी वाळके यांच्या प्रचारासाठी भाजपा कडून वाघमारे वस्ती प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये प्रचार वेगात आला असून या भागातील नागरिकांना उमेदवाराचे परिचय पत्रक देण्यात येत आहे. वास्तविक प्रत्येक गावात उमेदवारांकडून सभेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे.





