- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणपेरणे–लोणीकंद गटात तिरंगी लढतीचे स्पष्ट संकेत; योगेश झुरुंगे यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरणे...

पेरणे–लोणीकंद गटात तिरंगी लढतीचे स्पष्ट संकेत; योगेश झुरुंगे यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलली

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शिवसेनेनेही प्रचारात आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवार (दि. २७) दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत शिल्लक असतानाच तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केल्याने या गटात राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे.
हवेली तालुक्यातील या गटात आजवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचा प्रभाव असल्याने सुरुवातीला ही लढत थेट राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच होईल, अशी चर्चा होती. मात्र अपक्ष म्हणून ठाम ओळख निर्माण केलेले योगेश बाजीराव झुरुंगे यांनी शेवटच्या क्षणी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करून उमेदवारी स्वीकारल्याने पेरणे–लोणीकंद गटातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत.
जिल्हा परिषद सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदीप वसंत कंद, तर भाजपकडून किरण संपत साकोरे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र कोणत्याही दबावाला न झुकणारे, थेट जनतेशी संवाद साधणारे आणि स्वतंत्र विचारसरणीचे नेतृत्व म्हणून ओळख असलेले योगेश झुरुंगे थेट निवडणूक रिंगणात उतरल्याने प्रस्थापित उमेदवारांची धाकधूक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
योगेश झुरुंगे यांच्या मैदानातील एन्ट्रीमुळे ही निवडणूक आता केवळ दोन पक्षांपुरती मर्यादित राहिली नसून, तिरंगी व अत्यंत चुरशीची ठरण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेषतः स्थानिक प्रश्नांवर थेट भूमिका, तरुणांशी साधलेला संवाद आणि आक्रमक प्रचारशैलीमुळे झुरुंगे यांना मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र आहे.
२७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून, त्यानंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधीच राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांनी घरोघरी भेटी, सभा, संवाद मेळावे व बैठका घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page