- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणप्रदीप कंदांच्या प्रचारासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पत्नी स्नेहल बालवडकर लोणीकंद पेरणेच्या...

प्रदीप कंदांच्या प्रचारासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पत्नी स्नेहल बालवडकर लोणीकंद पेरणेच्या मैदानात

- Advertisement -spot_img

मतदारांशी साधला थेट संवाद
कोरेगाव भिमा :
पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ (बाणेर-बालेवाडी) मधून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिलेले नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पत्नी स्नेहल अमोल बालवडकर यांनी लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रदीपभाऊ कंद यांच्या प्रचारात उडी घेतली आहे. त्यांच्या सहभागामुळे या भागातील प्रचारात मोठी रंगत आली असून महिला मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
घरोघरी जाऊन साधला संवाद
स्नेहल बालवडकर यांनी या दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि प्रदीप कंद यांच्या कार्याची माहिती दिली. प्रदीप कंद यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करत असतानाच, त्यांनी बाणेर-बालेवाडी मॉडेलप्रमाणेच या भागातही विकासाची गंगा आणण्यासाठी कंद यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज व्यक्त केली.
प्रचार यंत्रणेसाठी सखोल मार्गदर्शन
केवळ जनसंपर्क न थांबता, स्नेहल बालवडकर यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि विशेषतः महिला भगिनींशी संवाद साधला. निवडणूक काळात प्रचार यंत्रणा कशी प्रभावी करावी, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सुयोग्य नियोजन कसे असावे आणि बुथ स्तरावर महिलांची भूमिका कशी महत्त्वाची आहे, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवाचा फायदा कार्यकर्त्यांना प्रचाराची रणनीती आखताना होत आहे.
प्रिया कंद यांच्याकडून स्वागत
या दौऱ्याप्रसंगी प्रदीप कंद यांच्या पत्नी प्रिया प्रदीप कंद यांनी स्नेहल बालवडकर यांचे उत्साहात स्वागत केले. या दोन खंबीर महिला नेतृत्वांनी एकत्र येत प्रचाराची धुरा सांभाळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी स्थानिक महिला पदाधिकारी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बालवडकर यांच्या सहभागामुळे लोणीकंद-पेरणे गटात प्रदीप कंद यांची बाजू अधिक भक्कम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page