कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
पेरणे फाटा, वाघमारे वस्ती, ता. हवेली येथील माहेर संस्था संचलित ज्ञानदीप विकास केंद्र आणि बुधराणी हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी shibr घेण्यात आले. यावेळी तब्बल ७० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
यावेळी माहेर संस्थेचे सुमित इंगळे, अनिता गायकवाड, गायत्री निर्मल, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक काळे, बुधराणी हॉस्पिटलचे प्रतीक्षा कांबळे, सुमित येरवाल आदी उपस्थित होते.

या तपासणी अंतर्गत मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना हॉस्पिटल चे माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार आहे. आभार प्रतीक काळे यांनी मानले.





