कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटातून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे उमेदवार म्हणून लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी तसेच लोणीकंद पंचायत समिती गणातून वंदना अण्णासो शिवले तसेच पेरणे गणातून छाया ज्ञानेश्वर वाळके यांनी पंचायत समिती सदस्य पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.

यावेळी उपजिल्हाप्रमुख निलेश काळभोर, लोणीकंदच्या माजी सरपंच प्रियांका झुरुंगे, पेरणेचे माजी उपसरपंच चांगदेव कोळपे, ज्ञानेश्वर वाळके, अण्णासो शिवले, सागर झुरुंगे, दीपक झुरुंगे, किसन टुले, भारत झुरुंगे, प्रतिक तापकीर, निलेश हिंगे, आण्णाराजे शिवले, आबा वाळके, किसन टुले, चांगदेव कोळपे, नाना देवकर, अमित लकडे, संग्राम विधाटे, शंतनु वाडेकर, दिपक झुरुंगे, भारत झुरुंगे, स्वप्निल झुरुंगे, अजिंक्य होले, अभिषेक झुरुंगे, हर्ष वानखेडे, प्रियंका झुरुंगे, स्वाती झुरुंगे, सोनाली झुरुंगे, चंदा झुरुंगे, रुपाली झुरुंगे, ज्योती झुरुंगे, मनिषा झुरुंगे, वैशाली होले, रुपाली गिरमे, सविता वाघुले, स्मिता भुजबळ, दत्ता शेठ गव्हाणे, ऋतिक भंडारे, सतीश वेताळ, अंबादास जाधव,शुभम वाळके, भानुदास टुले, अक्षय सातव,विकास भंडारे,सचिन काळभोर, पपू काळभोर, शांताराम टुले, सुजित तोसर, अक्षय शिवले, शिवकुमार शिवले, संतोष शिवले, नवनाथ शिवले, समर्थ शिवले, अमित रणपिसे, तेजस शिवले, तुषार शिवले, सार्थक शिवले, अथर्व शिवले, विराज चव्हाण, सुरज चौधरी, सारिका शिवले, मयुरी पवार, पल्लवी शिवले, तन्वी शिवले यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





