- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणवेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, पेरणे लोणीकंद गटात राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांना विजयी...

वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, पेरणे लोणीकंद गटात राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करा : आमदार कटके

- Advertisement -spot_img

कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
जागृत मतदारांनी स्वाभिमान जपा. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. या गटातील मतदारांनी तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. असे आवाहन शिरूर हवेली चे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी केले.

पेरणे, ता. हवेली येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार प्रदीप भाऊ वसंतराव कंद, लोचन विजय शिवले तसेच संगीता जालिंदर वाळके यांच्या वतीने आयोजित संवाद मेळाव्यात आमदार बोलत होते.
यावेळी पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील लोणीकंद, पेरणे, फुलगाव, तुळापूर, वढू खुर्द, भावडी , बकोरी, निरगुडी, वडगाव शिंदे – काकडे, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस या गावातील असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस चे तसेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.


आमदार पुढे म्हणाले की, प्रदीप भाऊ सारखे नेतृत्व समाजामध्ये कोणतेही पद नसताना देखील प्रभावी पणे आपले काम करत आहे. कुठेतरी राजकारणात दबलेल्या नेतृत्वाला जिल्हा परिषद मध्ये बसविण्याची आपली जबाबदारी आहे. प्रत्येक गावातील समस्या सोडविण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा भक्कम पाठिंबा असून मी देखील तुमचाच असल्याने या गटातील विकास नक्कीच होणार आहे.
महिलांना राष्ट्रवादी मुळे विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आहे. येणाऱ्या काळात छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाला देखील अजित दादांमुळे निधीची कमतरता भासणार नाही. तसेच १५ वर्षांपासून स्थानिक सामाजिक, शैक्षणिक, शेतकरी, विद्युत विभाग यांमध्ये असणारे समाजातील प्रश्न प्रदीप भाऊंचे मुळे सुटलेले आहेत. तसेच पद नसताना देखील या भागातील विविध कामात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता येत्या ५ तारखेला तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी आमदार माऊली कटके यांच्या माध्यमातून करण्यात आले.


यावेळी पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील विविध मान्यवरांनी आपापल्या गावातून जास्तीत जास्त मतांनी तिन्ही उमेदवारांना मतदान होईल अशी ग्वाही दिली.
येणारी निवडणूक ही माझी नसून जनतेची आहे. त्यामुळे मायबाप जनतेने माझी मागील १५ वर्षांपासून केलेल्या कामाची दखल घेऊन मला मतदान करावे. असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणाचा प्रश्न माझ्याकडून सुटला नाही. विजय आपलाच आहे परंतु मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता ही निवडणूक आपल्या हातात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन जिल्हा परिषद चे उमेदवार प्रदीप भाऊ वसंतराव कंद यांनी केले.
तर आज पर्यंत तुळापूर येथे कधीही पंचायत समितीची उमेदवारी मिळाली नसल्याची खंत व्यक्त करत. या भागातून राष्ट्रवादी चे उमेदवाराला नक्कीच मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास लोणीकंद पंचायत समिती गणातील उमेदवार लोचन शिवले यांनी व्यक्त केला.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page