- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणप्रदीप भाऊ यांची पेरणे लोणीकंद गटातील प्रश्न सोडविण्यावर भर, मतदार देणार त्यांना...

प्रदीप भाऊ यांची पेरणे लोणीकंद गटातील प्रश्न सोडविण्यावर भर, मतदार देणार त्यांना कामाची पावती !

- Advertisement -spot_img

आपली लोकशाही वृत्तसेवा
संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेला पेरणे – लोणीकंद जिल्हा परिषद गटातील हाय व्होल्टेज निवडणुकीत मागील पंधरा वर्षांपासून कोणतेही पद नसताना जनतेची सेवा करणारे प्रदीप भाऊ वसंतराव कंद यांना यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे असा शब्द या गटातील मायबाप जनतेकडून दिला जात असल्याने कुठेतरी या गटात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. त्यातच आता शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांची ताकत मिळाली आहे.
मागील पंधरा वर्षांपासून प्रदीप भाऊ कंद हे आपल्याकडे कोणतेही पद नसताना देखील सर्व सामान्य नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या, शेतकरी वर्गाच्या अडीअडचणी समजून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. ज्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी भाऊ अशी त्यांची ओळख लोणीकंद व परिसरातील अनेक गावांमध्ये आहे. प्रदीप भाऊ ज्यावेळेस विद्युत मंडळ वर होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये विद्युत रोहित्रांचे जाळे उभारण्यात आले. त्याचप्रमाणे अनेक शाळा, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणारे प्रश्न प्रदीप भाऊ लक्ष घालून ते सोडवले.


बैलगाडा शर्यती त चालू करण्यासाठी देखील त्यांचा वाटा हा नक्कीच मोलाचा आहे. बैलगाडा मालक नसताना देखील एक बैलगाडा शौकीन म्हणून या भागातील बैलगाडा घाट उभारण्यात त्यांचे देखील योगदान मोठे आहे. लोणीकंद तसेच पंचक्रोशीतील अनेक बैलगाडा घाटांना देखील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देणगी देण्यात आल्याने कुठेतरी घाट पूर्णत्वास आले.
आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटात अनेक इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. मात्र १५ वर्षांपासून जनतेची सेवा करणारे प्रदीप भाऊ कंद या निवडणुकीत करिश्मा दाखवतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page