- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणपेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटासाठी प्रदीप भाऊ कंद यांचा तर पंचायत समिती...

पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटासाठी प्रदीप भाऊ कंद यांचा तर पंचायत समिती साठी लोचन शिवले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

- Advertisement -spot_img

पुणे : प्रतिनिधी
अंत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रदीप (भाऊ) वसंतराव कंद यांनी अनेक समर्थका समवेत आपला जिल्हा परिषद उमेदवारीचा अर्ज तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोणीकंद तुळापूर पंचायत समिती गणातील उमेदवार लोचन शिवले यांनी देखील आपला पंचायत समितीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी राकेश भाऊ कंद, जयेश कंद, सचिन भोंडवे, पांडुरंग कंद, प्रतीक्षा टेमगिरे, तुषार झुरुंगे, सतीश रासकर, अक्षय खेडकर, मनीषा भोसले, प्रियाताई कंद, प्रवीण खलसे, अशोक सोडगीर, मंगेश कोलते, विकास जमादार, महेश बोर्डे, प्रवीण खलसे, अमित शिवले, विजय शिवले, सुनीता शिवले, अक्षय घुले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मागील १५ वर्षांपासून प्रदीप भाऊ यांनी कोणतेही पद नसताना देखील या भागातील विविध समस्या सोडविण्यासाठी नेहमीच आवाज उठविला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम तळागाळातील लोकांचे पर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीत पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील रखडलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवित असल्याचे यावेळी प्रदीप कंद यांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page