- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणनिळ वादळ संघटनेच्या माध्यमातून विशेष मुलांना जर्किंग वाटप

निळ वादळ संघटनेच्या माध्यमातून विशेष मुलांना जर्किंग वाटप

- Advertisement -spot_img

कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
शिक्रापूर, हिवरे बाजार रोड लगत असलेल्या श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद मुलांची कृषी कार्यशाळा येथे निळ वादळ सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जर्किंग वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन तसेच विकास कुंभार यांचा पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल निळ वादळ संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी निळ वादळ च्या संस्थापक अध्यक्षा दीपिका भालेराव, सामाजिक कार्यकर्त्या रिना सोनवणे, पवित्रा इंगळे, शिक्रापूर चे पोलिस उपनिरीक्षक विकास कुंभार, जितेंद्र पानसरे, संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गाडेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन मयूर भंडारे, रियाज पठाण, सरकार कांबळे, अभी माने, बाबा माने, महेश शिंदे, अभि कांबळे, ऋषिकेश कांबळे, चंदू शिंदे, साहिल भालेराव, स्वप्नील भालेराव, अजित नरवडे, ऋषिकेश चव्हाण, बंटी शेलार, सतीश कांबळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


यावेळी बोलताना दीपिका भालेराव यांनी सांगितले की, समाजात काम करत असताना आपण समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. याच हेतूने या मुलांसाठी थंडीच्या काळात जार्किंग वाटप चे नियोजन करण्यात आले. तसेच भविष्यात इतर अनेक समाजोपयोगी उपक्रम निळ वादळ संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचे दीपिका भालेराव यांनी यावेळी स्पष्ट केले.
सूत्रसंचालन प्रशांत साळवे यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गाडेकर यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page