कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
पुणे जिल्हा नियोजन समिती तसेच आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या विशेष प्रयत्नातून कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील म्हसोबानगर परिसरातील रस्त्याचे भूमिपूजन नुकतेचपुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कुसुम मांढरे, शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती मोनिका हरगुडे, सरपंच अनिकेत गव्हाणे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, प्रकाश ढेरंगे, नितीन गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्या मनिषा गव्हाणे, उद्योजक सत्यनारायण ढेरंगे, अविनाश शिंदे, सोमनाथ ढेरंगे, रामभाऊ ढेरंगे, जगदीश ढेरंगे, संतोष देसाई, संपत गव्हाणे, अनिल घायतीडक, प्रदीप काशीद, रवींद्र गव्हाणे, अंबादास बनसोडे, अनिल विचारे, शरद सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, श्याम मुजावर यांचे सह महिला बचत गटाच्या अध्यक्षा कोमल ढेरंगे, सरला ढेरंगे, मोनिका ढेरंगे, भारती ढेरंगे, राणी शिंदे, योगिता घायतिडक, कविता लगड, करुणा पाटील, विजया फावडे, सुवर्णा साळुंके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याने या भागातील रहिवासी, विद्यार्थी, महिला, कामगार वर्ग तसेच शेतकरी बांधवांना म्हसोबा नगर मधून पुणे नगर महामार्गावर येण्यास मोठी मदत होणार असल्याचे यावेळी बोलताना माजी उपसरपंच दत्तात्रय संभाजी ढेरंगे यांनी सांगितले.





