कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
संपूर्ण जिल्ह्याचे केंद्रस्थानी असलेल्या लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटात योगेश झुरुंगे यांनी विरोधी उमेदवारांचे विरोधात तगडे आव्हान उभे केल्याने या गटातील राजकीय समीकरणे बदलली असून येणाऱ्या निवडणुकीत धक्कादायक निकाल या गटात लागण्याची शक्यता आहे.

वास्तविक पहिल्यापासून या गटात सर्वाधिक ट्रिपा काशी – अयोध्या, नागपूर, दादर तर मध्यंतरी तुळजापूर, कोल्हापूर आदी ठिकाणी पार पडल्या. मात्र यामध्ये योगेश झुरुंगे यांनी काढलेली कात्रज येथील विद्यार्थ्यांसाठीची राजीव गांधी सर्पोद्यान ट्रिप काहीशी वेगळी होती. त्यातच पेरणे फाटा येथे घेण्यात आलेला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला देखील महिलांनी रात्री उशिरा पर्यंत भरघोस असा प्रतिसाद दिला.

त्यातच आता नुकतेच योगेश झुरुंगे मित्र परिवाराचे वतीने राजस्थान तसेच उज्जैन ट्रिपा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडल्या. यामध्ये हजारो पेरणे – लोणीकंद जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी सहभाग घेतला. वास्तविक योगेश झुरुंगे यांचे पाठीशी असलेली सर्व सामान्य नागरिकांची ताकद मोठी असल्याचे चित्र आहे. तसेच या ट्रिपा चे सुयोग्य नियोजन सागर झुरुंगे, राजू झुरुंगे आदींच्या माध्यमातून होत असल्याने या मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत आहे.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या जिल्हा परिषद निवडणुकीत तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित असून एक सर्वसामान्य कार्यकर्ता मित्र मंडळींच्या तसेच जागृत मतदारांच्या पाठिंब्यावर निवडणुकीत नक्कीच एक तगडे आव्हान देण्यास तयार आहे.





