- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणपेरणे च्या उपसरपंच पदी प्रीती कापरे बिनविरोध

पेरणे च्या उपसरपंच पदी प्रीती कापरे बिनविरोध

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
पेरणे, ता. हवेली ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी नुकतीच प्रीती संतोष कापरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच अक्षय गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच रुपेश ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी प्रीती कापरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे ग्रामसेवक कानिफनाथ थोरात यांनी जाहीर केले.
यावेळी दादासाहेब माने, दादा पाटील वाळके, माजी उपसभापती हवेली पंचायत समिती माऊली वाळके, माजी सभापती हवेली पंचायत समिती संजीवनी कापरे, माजी उपसरपंच राजू वाघमारे, बापूसाहेब कदम, रवींद्र वाळके, शिवाजी वाळके, संगीता वाळके, रेखा सरडे, अनिता सात्रस, अलका कोळपे, वर्षा वाळके, मंगल वामने, शीतल कापरे, अहिल्या टूले, सुवर्णा देंडगे, किरण भांडलकर, अशोक सरडे, चांगदेव कोळपे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या संजीवनी कापरे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रीती कापरे यांचा सन्मान करण्यात आला. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणावर भर देण्याबरोबरच महिलांसाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारची व्यावसायिक प्रशिक्षण शिबिरे घेणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच प्रीती कापरे यांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page