- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशरदचंद्रजी पवार विद्यालयात श्री धर्मवीर शंभूराजे क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

शरदचंद्रजी पवार विद्यालयात श्री धर्मवीर शंभूराजे क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

- Advertisement -spot_img

कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
वढू बुद्रुक, ता. शिरूर येथील शंभुराजे शिक्षण प्रसारक मंडळाच्या शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय येथे दरवर्षीप्रमाणे श्री धर्मवीर शंभूराजे क्रीडा महोत्सव उत्साहामध्ये संपन्न झाला. यामध्ये वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही क्रीडा प्रकारात स्पर्धकांनी मोठा सहभाग नोंदविला.
क्रीडा महोत्सवाचे उदघाट्न विद्यालयाची माजी विद्यार्थिनी व पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्नेहा राम शिवले यांच्या हस्ते कबड्डीच्या मैदानाचे पूजन करून उदघाट्न झाले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक आणि भावनिक विकास व्हावा या हेतूने दरवर्षी क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतो. क्रीडा महोत्सवांतर्गत कबड्डी, खो -खो, व्हॉलिबॉल, टेनी क्वाईन, ४०० मीटर रिले, क्रिकेट यासारखे सांघिक खेळ तर ५० मी., १०० मी., २०० मीटर धावणे, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी याशिवाय लहान मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.


याप्रसंगी क्रीडा विभागाचे प्रमुख रामचंद्र शिवले आणि उपविभागप्रमुख मंगल मोकाशी यांनी संपूर्ण क्रीडा महोत्सवाचे नियोजन केले.
या क्रीडा महोत्सवाच्या उत्तमरीत्या आयोजन आणि नियोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक विलास कुरकुटे, सोमनाथ भंडारे, मिठठू सोनवणे यांनी विशेष प्रयत्न केले. या क्रीडा महोत्सवामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
एकंदरीत सर्व स्पर्धांमध्ये २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. क्रीडा महोत्सवाला अनेक पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page