- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भिमाच्या सरपंच पदी अनिकेत गव्हाणे पाटील यांचा दणदणीत विजय

कोरेगाव भिमाच्या सरपंच पदी अनिकेत गव्हाणे पाटील यांचा दणदणीत विजय

- Advertisement -spot_img

आणि बबड्या सरपंच झाला…….
कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
धक्कादायक निकाल लावत शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी अनिकेत साहेबराव गव्हाणे पाटील यांनी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश देवराम ढेरंगे यांचा दणदणीत पराभव करत सरपंच पदी निवड झाली. कमी वयातील सरपंच पदी अनिकेत गव्हाणे यांच्या निवडीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून अनेक दिग्गजांच्या अंदाजावर अक्षरशः पाणी फिरले.

विद्यमान सरपंच संदीप ढेरंगे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. यावेळी माघारी नंतर महेश ढेरंगे आणि अनिकेत गव्हाणे या दोघांचे अर्ज राहिल्याने निवडणूक प्रक्रिया झाली. यावेळी अनिकेत गव्हाणे यांना ९ तर महेश ढेरंगे यांना ६ मतांवर समाधान मानावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोरेगाव भिमा च्या मंडल अधिकारी गुलफाम शेख, ग्राम महसूल अधिकारी संतोष जोशी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी विमल आव्हाड यांनी काम पाहिले.

एकूण १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये या निवडणुकीत दोन सदस्य गैरहजर राहिल्याने १५ सदस्यांनी या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतला.

वास्तविक संदीप ढेरंगे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शिल्लक राहिलेल्या महिन्यांसाठी महेश ढेरंगे व इतर ग्रामपंचायत सदस्य इच्छुक होते. परंतु या मतदान प्रक्रियेत अनिकेत गव्हाणे यांनी महेश ढेरंगे यांचा पराभव करत पुढील दोन्ही उमेदवारांच्या सरपंच पदावर फुलस्टॉप लावला.


या आधी पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत संदीप ढेरंगे आणि केशव फडतरे यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी संदीप ढेरंगे यांनी राजकीय खेळी करत सरपंच पद आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले होते. यावेळी देखील महेश ढेरंगे यांचे सरपंच पद जवळपास निश्चित वाटत असताना अनिकेत गव्हाणे यांनी बाजी मारली.


निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शिक्रापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ४० पोलिस ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात तैनात होते. यामुळे या भागात पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.


निवडीचे नंतर ग्रामपंचायत कार्यालय परिसरात तसेच गावातून नवनिर्वाचित सरपंच अनिकेत गव्हाणे यांची भंडारा आणि गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. याला युवक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.


यावेळी बोलताना सरपंच अनिकेत गव्हाणे यांनी ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्याला मतदान करत जो विश्वास दाखविला त्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच आपल्या कालावधीत गावातील रखडलेली विकास कामे जोमाने पूर्ण करू असा विश्वास व्यक्त केला.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page