कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट कोरेगाव भीमा संचलित फ्रेंड्स नर्सरी, प्रायमरी, सेकंडरी या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच गौरीनंदन कार्यालय पुणे नगर रोड कोरेगाव-भीमा येथे पार पडले. असल्याची माहिती इन्स्टिट्यूट चे सचिव दिलीप भोसले यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात लोककला, भारुड, नृत्य प्रबोधन शिवकालीन नाटक धर्मवीर संभाजी महाराज बलिदान, महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण प्रसंग, नाटक, विनोद, किस्से, आई-वडिलांची महती, असे वेगवेगळे कार्यक्रम उत्साहात, दिमाखात सादर करण्यात आले. तसेच विविध खेळांच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते गौरव मालनकर, अंकुश काने, पंकज पंचारिया हे उपस्थित होते. तसेच उपस्थित मान्यवरांमध्ये संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, सचिव दिलीप भोसले, खजिनदार डॉ. संजय पाटील, संस्थेचे संचालक सुनील दुगड व रामदास सव्वाशे, कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरेंगे, ग्रामपंचायत सदस्या वंदना गव्हाणे, रेखा ढेरंगे तसेच विस्ताराधिकारी राजेंद्र टिळेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सैंदाणे, उपमुख्याध्यापिका अजिता नायर सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका ज्योती सैदाणे व वैशाली धर्माधिकारी यांनी केले. आभार संस्थेचे सचिव दिलीप भोसले यांनी मानले तर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने केली.





