कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
नेतृत्व, आत्मीयता, जनसामान्याचा आवाज, आपला माणूस आणि आधुनिक युगातील सच्चा श्रावणबाळ लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील योगेश झुरुंगे मित्र परिवाराच्या वतीने व माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या देवदर्शन यात्रेला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हजारो भाविकांनी राजस्थान, मध्यप्रदेश पासून थेट महाराष्ट्रात एकच नाव गुंजले योगेश भाऊ …..

या यात्रेच्या पहिल्याच टप्प्यात हजारो भाविकांनी राजस्थानमधील सावरिया सेठ, खाटू श्याम, पुष्कर येथील जगातील एकमेव ब्रह्मदेव मंदिर तसेच उज्जैन येथील श्री महाकालेश्वराचे दर्शन घेतले. महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर भाविक भक्तिभावाने तृप्त झाले.

देवदर्शनानंतर भाविकांनी योगेशभाऊ झुरुंगे यांना विजयी आशीर्वाद दिले व त्यांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली. अनेक वृद्ध, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना देवदर्शन झाल्याने समाधान व्यक्त करत योगेश झुरुंगे यांच्या विजयासाठी देवाचरणी साकडे घातले.
या यात्रेसाठी आयोजकांकडून लक्झरी बसेस, सकस व स्वादिष्ट भोजन, निवास व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा व स्वयंसेवकांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक यात्रेकरूची स्वतंत्र काळजी घेतली. यात्रा पूर्णपणे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रत्येक स्वयसेवक जीव ओतून काम करत होता.

या यात्रेत सावरिया सेठ, खाटू श्याम, पुष्कर आणि उज्जैन महाकालेश्वर या पवित्र स्थळांचा समावेश होता. पुष्कर येथे आयोजित भजन संध्येमध्ये सुप्रसिद्ध भजन गायक दीपक राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांकडून सादरीकरणाने भाविक मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमातून धार्मिकतेबरोबरच सामाजिक एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले. या भजन संध्येत भाविक भक्तीरसात तल्लीन होऊन नृत्य करत रंगून गेले. ही देवदर्शन यात्रा म्हणजे केवळ धार्मिक उपक्रम नसून भक्ती, सेवा, शिस्त व सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम असल्याची भावना भाविकांमधून व्यक्त होत आहे.
निवडणूक ही फक्त निमित्तमात्र आहे पहिल्यापासून आपण समाजासाठी काम करतोय आणि पुढे देखील करणार आहोत अशी भावना या वेळी या गटातील उमेदवार योगेश भाऊ झुरुंगे यांनी व्यक्त केली.





