- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणप्रदीप भाऊ कंद यांना पेरणे - लोणीकंद जिल्हा परिषद गटातील जनतेचा वाढता...

प्रदीप भाऊ कंद यांना पेरणे – लोणीकंद जिल्हा परिषद गटातील जनतेचा वाढता पाठिंबा

- Advertisement -spot_img

कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
मागील अनेक वर्षांची तपश्चर्या, जनतेशी जोडलेली नाळ, पदाची अपेक्षा न करता सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी बाधवांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हवेली तालुक्यातील पेरणे – लोणीकंद जिल्हा परिषद गटात सध्या एकच चर्चा ! “अडचण जिथे, प्रदीप भाऊ मार्ग तिथे” यांच्या माध्यमातून सातत्याने जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे, तात्काळ मदतीस धावून जाणारे आणि प्रत्येक समस्येची प्रत्यक्ष सोडवणूक करणारे नेतृत्व म्हणून प्रदीप भाऊ वसंतराव कंद यांच्याकडे गटातील जनता एका विश्वासाने पाहत आहेत.
वीजपुरवठ्याच्या अडचणी असोत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, खराब रस्त्यांची समस्या असो किंवा धार्मिक-सामाजिक उपक्रम प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतः लक्ष घालून प्रश्न मार्गी लावले आहेत. लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये त्यांनी केलेली तात्काळ कार्यवाही आजही नागरिकांच्या स्मरणात आहे.


फोनवर माहिती मिळताच प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचून परिस्थिती समजून घेणे, संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणे, ही प्रदीप भाऊ कंद यांची कार्यशैली ठरली आहे. त्यामुळेच लोणीकंद – पेरणे गटातील सामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात त्यांच्या कामाबद्दल समाधान आणि आपुलकीची भावना दिसून येते. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही प्रदीप भाऊ कंद यांचा सहभाग तितकाच ठळक आहे.
देवदर्शन यात्रा, वारकऱ्यांची सेवा, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी लोकांशी नाते अधिक घट्ट केले आहे. या सर्व कामांमुळे प्रदीप भाऊ कंद हे केवळ नेता म्हणून नव्हे, तर आपला माणूस म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी स्पष्ट भूमिका घेतली असून, जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी उभे राहणाऱ्या प्रदीप भाऊ कंद यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहायचे, असा सूर सर्वत्र उमटत आहे. लोकविश्वास, कार्यक्षमतेची प्रत्यक्ष अनुभूती आणि सातत्यपूर्ण जनसेवा यामुळे प्रदीप भाऊ कंद हे या गटातील जनतेचे विश्वासाचे नेतृत्व ठरत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page