- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणयोगेश झुरुंगे मित्रपरिवारचे वतीने खाटूशाम- अजमेर दर्शन यात्रेचे थोड्याच दिवसात आयोजन

योगेश झुरुंगे मित्रपरिवारचे वतीने खाटूशाम- अजमेर दर्शन यात्रेचे थोड्याच दिवसात आयोजन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पेरणे – लोणीकंद जिल्हा परिषद गटातील उमेदवारांनी काशी अयोध्या सहली आयोजित केल्या आहेत. परंतु याला फाटा देत लोणीकंद गावचे माजी उपसरपंच योगेश भाऊ झुरुंगे यांच्या मित्र परिवाराचे माध्यमातून राजस्थान मधील देवदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून या गटातील नागरिकांचा देखील राजस्थान ट्रिप साठी भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी योगेश भाऊ झुरुंगे यांनी सांगितले.


जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी योगेशभाऊ झुरुंगे मित्र परिवार आयोजित राजस्थान देवदर्शन यात्रा सध्या सर्वत्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. यात्रेची घोषणा होताच अवघ्या काही दिवसांत पहिल्या टप्प्याचे बुकिंग पूर्ण झाले असून, हा विक्रमी प्रतिसाद पाहून संपूर्ण परिसरात एकच चर्चा – अशी व्यवस्था, असा उत्साह यापूर्वी कधीच पाहिला नव्हता, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणीकंद येथून निघणाऱ्या या यात्रेसाठी लक्झरी बसेस, उत्तम भोजन, अल्पोपहार, शुद्ध पिण्याचे पाणी, निवास सुविधा आणि आरोग्य व्यवस्था अत्यंत उच्च प्रतीची असल्याची माहिती इच्छुक उमेदवार लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश झुरुंगे यांचे बंधू राजेश झुरुंगे यांनी दिली आहे.


यात्रा नियोजनामध्ये सागर झुरुंगे, भारत झुरुंगे, चेतन झुरुंगे, दीपक झुरुंगे, राजू वाघुले, संग्राम विधाते, हर्ष वानखेडे या खंबीर कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली असून, संपूर्ण यात्रेचे समन्वयक सागर कैलास झुरुंगे यांनी अत्यंत काटेकोर नियोजन करून यात्रेला भव्य रूप दिले आहे.
यात्रेबाबत बोलताना आयोजक राजेश झुरुंगे म्हणाले, लोकांच्या उत्साहाने आम्ही भारावून गेलो आहोत. राजस्थान देवदर्शन यात्रा केवळ प्रवास नाही तर आध्यात्मिक ऊर्जा देणारा अनुभव ठरणार आहे. पहिल्या टप्प्याच्या बुकिंगला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे लोणीकंद परिसरात उत्साहाची लाट असून, पुढील दुसऱ्या टप्प्यांच्या घोषणेकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page