कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
महिलांना घर, मुलं, व्यवसाय, नोकरी सांभाळत असताना स्वतः साठी वेळ देता येत नाही. आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी लोणीकंद चे माजी उपसरपंच आणि पेरणे – लोणीकंद जिल्हा परिषद गटातील उमेदवार योगेश (भाऊ) झुरुंगे यांच्या मित्र परिवाराचे वतीने पेरणे फाटा येथे खेळ पैठणीचा – उत्सव नारीशक्तीचा या अंतर्गत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले.

पेरणे फाटा, ता. हवेली येथील सॅफरॉन बँक्वेट हॉल, आमदार नगर येथे हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील पेरणे, वढू खुर्द व फुलगाव परिसरातील माता-भगिनींसाठी सक्रिय सहभाग नोंदवित या खेळाचा मनमुराद आनंद लुटला. या होम मिनिस्टर स्पर्धेत पाचशे हून अधिक महिला, मुली यांनी सहभाग नोंदविला. पाच फेऱ्यांमध्ये स्पर्धा पार पडली. सेमीफायनलमध्ये २५ तर फायनलमध्ये १२ महिला स्पर्धक पोहोचल्या.

कार्यक्रमाचे सादरीकरण महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट निवेदिका पुरस्कार विजेत्या प्रतिभा पाटील यांनी केले. महिलांचा सहभाग वाढवून परिसरातील सांस्कृतिक वातावरण समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात पाचशेहून अधिक महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. .
फायनलमध्ये निवड झालेल्या १२ महिलांपैकी ११ महिलांना मुख्य बक्षिसे व एक उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. सर्व १२ जणींना पैठणी साडी प्रदान करण्यात आली. बक्षीसप्राप्त महिलांची नावे पुढीलप्रमाणे— संजीवनी झुरुंगे – एलईडी टीव्ही, मीरा मुंडे – वॉशिंग मशीन, ज्योती नवले – फ्रिज, सुमन वाडेकर – कुलर, नंदिनी नाईकवाडे – शिलाई मशीन, अर्चना थोरात – वॉटर फिल्टर, नीता देवडे – ओव्हन, शुभांगी निंबाळकर – मिक्सर, गीताबाई सुपेवाड – फॅन, मंजू चौधरी – इस्त्री, मनीषा बारवकर – डिनर सेट, प्रियंका जाधव – पैठणी (उत्तेजनार्थ)
या कार्यक्रमास लोणीकंदचे माजी आदर्श सरपंच अनिल होले, पेरणेचे माजी उपसरपंच संतोष कापरे, डॉ. शिवांजली वाळके, रघुनाथ तापकीर, सुधीर कंद, जयेश कंद, बालाजी रास्ते यांच्यासह परिसरातील आजी-माजी सरपंच व मान्यवर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेशभाऊ झुरुंगे मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर झुरुंगे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत लोणीकंदच्या माजी सरपंच प्रियांका झुरुंगे यांनी केले. तर आभार माजी उपसरपंच योगेश झुरुंगे यांनी मानले.





