- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणयोगेश झुरुंगे मित्रपरिवारचे वतीने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे येत्या रविवारी आयोजन

योगेश झुरुंगे मित्रपरिवारचे वतीने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे येत्या रविवारी आयोजन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
देवदर्शन, लहान मुलांना/ विद्यार्थ्यांना कात्रज येथील राजीव गांधी सर्पोद्यान तसेच गटातील रस्त्यांचे कामांचे पाठोपाठ आता लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील पेरणे, वढू खुर्द आणि फुलगाव परिसरातील सर्व माता-भगिनींसाठी लोणीकंद गावचे माजी उपसरपंच योगेशभाऊ झुरुंगे मित्रपरिवार यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे बरोबरच होम मिनिस्टर या महिलांचे आकर्षण असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


एकीकडे महिलांना घरातील, शेतातील तसेच नोकरी व्यवसाय सांभाळत असताना आपल्या सुप्त गुणांना न्याय देता येत नाही. मनात असून ही आपली कला दाखवता येत नाही. हीच मनातील व्यथा लक्षात घेत योगेश झुरुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मित्रपरिवाचे वतीने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

तरी महिला वर्गाने कार्यक्रम स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन या गटातील जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार आणि लोणीकंद चे माजी उपसरपंच योगेश झुरुंगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


‘खेळ पैठणीचा, सन्मान नारीशक्तीचा’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट निवेदिका पुरस्कार विजेत्या प्रतिभा पाटील यांच्या विशेष उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रम सादर होणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी पेरणे फाटा येथील सॅफरॉन बँकेट हॉल, आमदार नगर येथे आयोजित होणार आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page