- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणसणसवाडीच्या सरपंच पदी शशिकला सातपुते बिनविरोध

सणसवाडीच्या सरपंच पदी शशिकला सातपुते बिनविरोध

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
सणसवाडी, ता . शिरुर गावच्या सरपंच पदी नुकतीच शशिकला रमेश सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान सरपंच रूपाली दरेकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी एकमेव अर्ज आल्याने शशिकलाताई रमेश सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, उपसरपंच राजेंद्र दरेकर, ग्रामपंचायत सदस्य मोहन नाना हरगुडे, मोहन तुकाराम हरगुडे, तनुजा दरेकर, सोसायटीचे माजी चेअरमन गोरख दरेकर, माजी सरपंच युवराज दरेकर, माजी उपसरपंच विजयराज दरेकर, सागर दरेकर, बाबासाहेब दरेकर, सुनिता दरेकर, नवनाथ भुजबळ, दत्ताभाऊ हरगुडे, संभाजी साठे, माजी सरपंच रूपाली दरेकर, सुनंदा दरेकर, सुवर्णा दरेकर, स्नेहल भुजबळ, संगीता हरगुडे, आशा दरेकर, नियोजन समिती सदस्य पंडितआप्पा दरेकर, सोसायटी माजी चेअरमन सुहास दरेकर, कैलास दरेकर, रवींद्र भुजबळ, गजाबाप्पू हरगुडे, मनसे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, माजी सदस्य ललिता भुजबळ, अनिल दरेकर, उद्योगपती रामदास दरेकर, दगडू दरेकर, मच्छिंद्र हरगुडे, नवनाथ दरेकर, शिवसेना तालुका अध्यक्ष अमोल हरगुडे, अशोक हरगुडे, गोरख भुजबळ मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.


सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिरूर हवेली चे माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे आदींनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page