- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमीना ढेरंगे कोरेगाव भिमा - सणसवाडी गणातून पंचायत समितीसाठी इच्छुक

मीना ढेरंगे कोरेगाव भिमा – सणसवाडी गणातून पंचायत समितीसाठी इच्छुक

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
एकीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी आहेत याचा अंदाज बांधला जात असताना कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील उद्योजिका आणि माजी ग्रामपंचायत सदस्या मीना शिवाजी ढेरंगे यांनी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचे दर्शन घेत कोरेगाव भिमा – सणसवाडी पंचायत समितीच्या गणात गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली.


एकीकडे या पंचायत समितीच्या गटात अनेक महिला इच्छुक असून या गणाचे तिकीट कोणाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरेगाव भिमा, वाडा पुनर्वसन तसेच सणसवाडी या तीन गावांचा मिळून पंचायत समितीचा गण आहे. भविष्यात उमेदवारी कोणाला मिळेल याचे तर्क वितर्क लावले जात असताना. मतदार राजा पर्यंत पोचण्याची एक ही संधी सध्या या गणातील इच्छुक उमेदवार सोडत नाहीत.
सर्वच राजकीय पक्षांशी असलेले त्यांचे संबंध प्रत्येकाच्या कार्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या तसेच ग्रामपंचायत सदस्या ते सामाजिक कार्यकर्त्या मीना शिवाजी ढेरंगे यांचा प्रवास असून महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. ही कुठेतरी जमेची बाजू मीना ढेरंगे यांची आहे.


श्री भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेत त्यांनी कुठे तरी निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने मीना शिवाजी ढेरंगे यांचा गाव भेट दौरा कुठेतरी चर्चेत आला आहे. यावेळी मीना ढेरंगे यांनी ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांना प्रत्यक्ष गाठ भेट देत आपली ओळख करून दिली.
कोरेगाव भिमा – सणसवाडी गणातील पंचायत समितीची जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने गावातूनच अनेक महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून या गणातील प्रत्यक्ष उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page