- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशक्ती प्रदर्शन करत केसनंद - वाडेबोल्हाई गणातील उमेदवार कुशल (नाना) सातव यांचा...

शक्ती प्रदर्शन करत केसनंद – वाडेबोल्हाई गणातील उमेदवार कुशल (नाना) सातव यांचा सांगवी सांडस येथे गावभेट दौरा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
केसनंद–वाडेबोल्हाई पंचायत समिती गणाचे तरुण आणि लोकप्रिय इच्छुक उमेदवार कुशाल (नाना) गोरख (आबा) सातव यांच्या सांगवी सांडस ग्रामदौ-याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गाव भेटीदरम्यान ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, औक्षण व फटाक्यांची आतीषबाजी करत कुशल सातव यांचे भव्य स्वागत केले.


या स्वागत सोहळ्याला तब्बल २०० वाहनांचा ताफा सोबत होता. सभेत ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात “कुशल नानालाच मतदान” करण्याची शपथ घेतली. एका नागरिकाने भगवान विष्णूची शपथ घेऊन मतदानाची हमी दिली. गावातील तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भाषणात कुशल सातव हे सर्व समाजाच्या कल्याणासाठी काम करणारे नवीन, सक्षम व विकासाभिमुख नेतृत्व असल्याचे मत व्यक्त केले.


कार्यक्रमात एका ग्रामस्थाने कुशल सातव यांच्यावर सुंदर गीत सादर केले. आपल्या भाषणात कुशल सातव म्हणाले, “कुशल नाना सातव म्हणजे मी एकटा नाही, माझ्यासोबत काम करणारे सर्वच कुशल सातव आहेत. मी पदासाठी नव्हे तर जनतेच्या विकास व सेवेसाठी निवडणूक लढवत असल्याचे सांगितले व येथील विकासासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द सातव यांनी दिला.
या गाव भेट दौरा व कार्यक्रमा अनेक मान्यवर, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे, रामभाऊ शितोळे, शांताराम पाबळे, रवींद्र लोले, सरपंच मीनाताई लोले, मा. चेअरमन दत्तात्रय गेनबा लोले, माजी ग्रा. सदस्य भीमराव सपकाळ विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक संतोष लोंढे , माजी उपसरपंच शैलेश तळेकर, सचिन बागायतदार, बाळासाहेब लोले, सा. का. संजय लोले, संजय तळेकर, विठ्ठल निलख, पुणे जिल्हा सरचिटणीस दिनेश पाबळे,वउद्योजक गोविंद शितोळे, ज्ञानेश्वर शितोळे, प्रमोद तळेकर, संभाजी लोले, विकास शितोळे, नाना गाडे, मारुती तळेकर, विशाल तळेकर, सुधीर लोले, स्वप्निल लोले, शालेय समिती अध्यक्ष भारत लोले, अजित तळेकर आदी मान्यवरासह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पाबळे (पुणे जिल्हा सरचिटणीस) यांनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page