◆◆ बुर्केगाव विविध कार्यकारी विकास सोसायटी निवडणूक ◆◆
कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
सोसायटीच्या सभासदांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक तसेच शासनाच्या वतीने जाहीर करण्यात येणाऱ्या प्रत्येक योजना तळागाळातील शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी आमचा प्रयत्न राहील तसेच भविष्यात सभासदांना शेतीसाठी अल्प दरात कर्ज पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन बुर्केगाव चे सरपंच संतोष पवळे यांनी दिले.
बुर्केगाव विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या निवडणुकीत श्री गणेश काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेलच्या नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ नुकताच गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात करण्यात आला. तत्पूर्वी पॅनेलच्या सर्व उमेदवारांची डोंगरगाव च्या शिवे पासून बुर्केगाव पर्यंत पारंपरिक वाद्यांच्या साथीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. डोंगरगावचे माजी सरपंच अशोक गायकवाड, सरपंच संतोष पवळे, प्रवीण महाराज गजरे, माऊली ठोंबरे, अनिल गायकवाड, माजी सरपंच संतोष गायकवाड, माजी चेअरमन साळभाऊ ठोंबरे आदी मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात आला.
याप्रसंगी बोलताना पॅनेलचे उमेदवार एकनाथ बाजारे यांनी सदर निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर सोसायटीचे कार्यालय पेरणे फाट्यावर आहे ते सहा महिन्याच्या आत बुर्केगाव येथे सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे लोकांना शेतकऱ्यांना फाट्यावर जाऊन जो त्रास सहन करावा लागतो तो त्रास बंद होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा मेंढपाळ संघटनेचे अध्यक्ष माऊली ठोंबरे, उपसरपंच अर्जुन ठोंबरे, माजी चेअरमन साळभाऊ ठोंबरे, माजी उपसरपंच सुरेश यनभर, दीनाभाऊ जांभळकर, राजेंद्र बाजारे, नितीन यनभर, राजेंद्र गुंड, माजी सरपंच अशोक गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अनिल गायकवाड, खादी ग्रामोद्योग चे सदस्य दीपक रायकर, माजी पंचायत समितीच्या सदस्या हौसाबाई ठोंबरे, माजी चेअरमन बापूसाहेब कोकरे, रघुनाथ हरपळे, धूळाजी वाघमोडे, माजी चेअरमन अमृता पवळे, बाळासाहेब काळे, दिनेश बाजारे, निवृत्ती दाभाडे, ह. भ. प. धोंडिबा थोरात, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका उपाध्यक्ष मनोज जांभळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास ठोंबरे, शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष गणेश बाजारे, प्रा. बबनराव ठोंबरे, उद्योगपती संदीप थोरात, माजी सरपंच वर्षा पवळे, सुनीता बाजारे, वृषाली भोरडे, उज्वला भोरडे, शांताबाई भोरडे, अनिता गायकवाड, अरुणा गायकवाड, माजी उपसरपंच सुजाता गडदे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
◆◆ गणेश काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेलचे उमेदवार पुढील प्रमाणे ◆◆
सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी –
काशिनाथ गंगाराम कोकरे, कृष्णा भिवराज जांभळकर, सीताराम दामू ठोंबरे, दिनकर कुंडलिक थोरात, आबाजी रामचंद्र दाभाडे, एकनाथ तात्याबा बाजारे, भाऊसाहेब गेनभाऊ भोरडे, दशरथ बाबुराव यनभर
महिला प्रतिनिधी – लता बाळासाहेब काळे, शारदा रामदास ठोंबरे
इतर मागासवर्ग प्रतिनिधी – संगीता दीपक रायकर,
भटक्या जाती जमाती –विलास हरीचंद्र ठोंबरे,






