- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोल्हापूर देवदर्शन यात्रेचे योगेश झुरुंगे यांचे कडून नियोजनबद्ध आयोजन

कोल्हापूर देवदर्शन यात्रेचे योगेश झुरुंगे यांचे कडून नियोजनबद्ध आयोजन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
सर्वाधिक चर्चेत असलेल्या लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटात निवडणूक जाहिरात होताच देवदर्शन यात्रेचा झपाटा लावला असून या गटातील उमेदवार आणि लोणीकंद चे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या पुढाकाराने नुकतीच नरसोबाची वाडी, अदमापूर, कोल्हापूर आणि ज्योतिबा मंदिर देवदर्शन यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. या यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेकडो भाविकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.


दोन दिवस निघालेल्या या देवदर्शन यात्रेत भाविकांसाठी सर्वच प्रकारच्या सुविधांचे नियोजन आयोजकांच्या वतीने उकृष्ट करण्यात आले असल्याने अनेक यात्रेकरूंनी सांगितले. यामध्ये चहा, नाश्ता, जेवण, निवास तसेच इतर सुविधा पुरविण्यात आल्या.


यात्रेकरूंनी कोल्हापूरच्या आई अंबाबाई, ज्योतिबा, आदमापूर येथील बाळूमामा तसेच नरसिंह वाडीतील श्री दत्त मंदिर अशा पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. नरसिंहवाडीचे दत्त मंदिर कृष्णा–पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले असून श्री दत्तप्रभूंचे अवतार ‘श्री नृसिंह सरस्वती’ यांनी येथे बारा वर्षे तपश्चर्या केली होती, यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. या सेवाभावी यात्रेच्या उत्कृष्ट नियोजनाचे भाविकांनी मनापासून कौतुक केले.
धार्मिक, सामाजिक व जनकल्याणासाठी उपयुक्त उपक्रम सातत्याने राबविल्याबद्दल इच्छुक उमेदवार योगेश झुरुंगे यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक भावना वाढीस लागल्या आहेत.माजी उपसरपंच योगेश झुरुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे उत्कृष्ट नियोजन सागर झुरुंगे, दीपक झुरुंगे, राजेश झुरुंगे, स्वप्निल झुरुंगे, भारत झुरुंगे यांनी केले.


मागील काही दिवसांपासून लहान मुलांसाठी कात्रज सर्पोद्यान, चैत्यभूमी, दीक्षाभूमी तसेच आताची कोल्हापूर देवदर्शन यात्रा मोठ्या उत्साहात पार पडल्या असून मायबाप जनता नक्कीच माझ्या पाठीशी उभी राहील असा विश्वास या गटातील उमेदवार योगेश झुरुंगे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page