- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव ग्रामस्थ - सल्लागार समिती तसेच व्हॉईस ऑफ मिडिया चे वतीने शिवांजली...

कोरेगाव ग्रामस्थ – सल्लागार समिती तसेच व्हॉईस ऑफ मिडिया चे वतीने शिवांजली चा सन्मान

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
छत्रपती संभाजी हायस्कूल ने गावाला मोठे उद्योजक, गाव कारभारी तसेच विविध क्षेत्रात गावचे नाव उंचीवर नेणारे विद्यार्थी दिले आहेत. विद्यालयातील एक विद्यार्थिनी क्रीडा प्रकारात राज्यातून प्रथम क्रमांक मिळवून ती राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी पात्र ठरली ही शाळेच्या बरोबरच गावासाठी कौतुकाची बाब असल्याचे मत घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक कैलासराव सोनवणे यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भिमा, ता. शिरुर येथील स्वामी विवेकानंद शिक्षक संस्थेच्या श्री छत्रपती संभाजी हायस्कूल ची विद्यार्थिनी शिवांजली वसंत फडतरे हिची नुकतीच कराटे स्पर्धेत राज्यात प्रथम येऊन राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल तिचा कोरेगाव भिमा ग्रामस्थ, विद्यालयाची स्थानिक सल्लागार समिती तसेच व्हाइस ऑफ मिडियाचे संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभात सोनवणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कोरेगाव भिमा चे आदर्श सरपंच संदीप ढेरंगे होते.


यावेळी माजी सरपंच अमोल गव्हाणे, स्वामी विवेकानंद शिक्षक संस्था स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष रवींद्र फडतरे, सदस्य बापूसाहेब शिंदे, व्हॉईस ऑफ मिडिया चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इरशाद शेख, विकास सोसायटी चे माजी चेअरमन बबुशा ढेरंगे, उद्योजक संतोष काशिद, विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकोरे आदी मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धा २०२५ स्पर्धेमध्ये शिवांजली वसंत फडतरे हिने ४२ ते ४६ किलो वजन गटात
सुवर्णपदक मिळविले. तसेच तीची आता पुढे राष्ट्रीय स्तरावर कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिवांजली हिला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सोमनाथ पिचड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
भविष्यातील खेळाडू घडविण्यासाठी कोरेगाव भिमा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ नेहमीच पुढे राहतील तसेच शिवांजली व इतर खेळाडूंसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी आदर्श सरपंच संदीप ढेरंगे यांनी दिली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page