- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणयोगेश झुरुंगे यांच्या पुढाकाराने चैत्यभूमी दर्शन व कात्रज सरपोद्यान सहल

योगेश झुरुंगे यांच्या पुढाकाराने चैत्यभूमी दर्शन व कात्रज सरपोद्यान सहल

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील विद्यार्थी आणि जनतेसाठी माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या पुढाकाराने मुंबई येथील पवित्र चैत्यभूमी दर्शन यात्रेचे तसेच कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सर्पोद्यान सहलीचे भव्य आयोजन करण्यात आले. या दोन्ही उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून असंख्य मुलं–मुली व भाविकांनी या यात्रांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला.


कात्रज सर्पोद्यान पाहण्यासाठी बुर्केगाव येथून दोन बस रवाना करण्यात आल्या. शेकडो मुलं–मुलींची ही शैक्षणिक सहल अत्यंत आनंदाच्या आणि जल्लोषाच्या वातावरणात सकाळी लोणीकंद येथे सर्वांसाठी चहा–नाश्त्याची व्यवस्था केल्यानंतर सहलीचा ताफा मंगलमय वातावरणात रवाना झाली
तर दुसरीकडे लोणीकंद–पेरणे गटातील नागरिकांसाठी आयोजित मुंबई (दादर) येथील चैत्यभूमी दर्शन यात्रेसाठीही शेकडो भाविकांसह सकाळी मुंबईकडे मार्गस्थ झाल्या. यात्रेकरूंसाठी चहा–नाश्ता, जेवण यांची उत्तम व शिस्तबद्ध व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली. भाविकांनी या सेवाभावी नियोजनाचे मनापासून कौतुक केले.


यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी आणि ताफा मार्गस्थ करण्यासाठी माजी उपसरपंच योगेश झुरुंगे, आयोजक सागर झुरुंगे, दीपक झुरुंगे, राजेश झुरुंगे, स्वप्निल झुरुंगे, भारत झुरुंगे, भाऊसाहेब ठोंबरे, भीमा ठोंबरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धार्मिक, सामाजिक व जनतेसाठी उपयुक्त असे उपक्रम सातत्याने राबविल्याबद्दल इच्छुक उमेदवार योगेश झुरुंगे यांच्याबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना असून, त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे आयोजक सागर झुरुंगे यांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page