गजानन गव्हाणे पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा शोभा राजाराम हरगुडे यांचा आमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांच्या हस्ते तसेच केसनंदचे सरपंच तसेच विद्यमान संचालक मिलिंद नाना हरगुडे (कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे) यांच्या प्रमुख उपस्थित पक्षप्रवेश संपन्न झाला.
यावेळी शशिकांत गायकवाड उपसभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, केसनंद गावचे माजी सरपंच तानाजी हरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वाबळे, यशवंतचे विद्यमान संचालक रामदास गायकवाड व युवा कार्यकर्ते ऋषिकेश हरगुडे, ओंकार हरगुडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्ष संघटना मजबूत करणे तसेच येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळून देण्यासाठी माझा प्रयत्न असणार असून या पुढील काळात जास्तीत जास्त महिला पक्ष प्रवेश करतील असा विश्वास शोभा हरगुडे यांनी व्यक्त केला.





