- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भिमा व परिसरात गुटख्याची सर्रासपणे विक्री

कोरेगाव भिमा व परिसरात गुटख्याची सर्रासपणे विक्री

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा व परिसरामध्ये सर्रास आणि मोठ्या प्रमाणात पान टपऱ्या आणि किराणा दुकानदार यांच्याकडून गुटख्याच्या पाकिटांची राजरोज पणे विक्री होत असून प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत असल्याने युवा पिढी कुठेतरी व्यसनाधीन होत चाललेले चित्र सध्या कोरेगाव भीमा व परिसरात पाहायला मिळत आहे.
या भागात परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात दुचाकीवरून गुटख्याच्या पाकिटांची किराणा दुकानदार तसेच पान टपऱ्या मध्ये बिंदासपणे विक्री होत आहे. तसेच या गुटख्यामुळे अनेक युवक सध्या व्यसनाधीन होत चालले असून उद्याची भावी पिढी कुठेतरी डगमगत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
१८ ते ३० वयोगटातील असंख्य युवक दिवस-रात्र गुटखा चगळत असल्याने याचा त्यांच्या शरीरावर देखील परिणाम होत असून गावातील प्रत्येक चौकामध्ये लाल रंगाचा गुटख्याचा सडा पडलेले चित्र सध्या कोरेगावातील जवळपास प्रत्येक चौकात तसेच महामार्गावर पाहायला मिळत आहे.
तरी प्रशासनाने उद्याची भावी पिढी वाचण्यासाठी किमान अशा गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page