- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणविकास सोसायटी चे नवनियुक्त चेअरमन महादेव फडतरे यांचा सन्मान

विकास सोसायटी चे नवनियुक्त चेअरमन महादेव फडतरे यांचा सन्मान

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील विविध कार्यकारी विकास सोसायटी क्रमांक २ च्या चेअरमन पदी नुकतीच महादेव सोपानराव फडतरे यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल त्यांचा नुकताच माजी सरपंच बाळासाहेब गोविंदराव फडतरे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
यावेळी कोरेगाव भिमा ग्रामपंचायत चे माजी सदस्य तूळशीदास फडतरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण फडतरे, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, कानिफनाथ सोसायटीचे व्हा. चेअरमन शांताराम फडतरे उपस्थित होते.
विकास सोसायटीचे कार्यालयात पार पडलेल्या या चेअरमन पदाच्या निवडीत महादेव फडतरे यांचा पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडी बद्दल सोसायटी कार्यालयात तसेच गावातील प्रमुख चौकात त्यांचा सत्कार करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे.


या सत्काराला उत्तर देताना महादेव फडतरे यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच शेती पूरक व्यवसायासाठी विविध कार्यशाळा भविष्यात आयोजित करणार असल्याचे महादेव फडतरे यांनी सांगितले.
तर १९८४ ते २००५ पर्यंत तब्बल २३ वर्षे छत्रपती दूध डेअरी चे चेअरमन पद देखील महादेव फडतरे यांनी भूषविले आहे. एक साधा प्रगतशील शेतकरी ते विकास सोसायटीचे चेअरमन असा संपूर्ण प्रवास यावेळी त्यावेळचे डेअरी चे सचिव आणि ग्रामपंचायत चे माजी सदस्य तुळशीदास फडतरे यांनी उलगडला.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page