कोरेगाव भिमा : विशेष प्रतिनिधी
पेरणे – जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत पै. किरण साकोरे यांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्या टप्प्यातील काशी – अयोध्या यात्रेचे आयोजन येत्या २० नोव्हेंबर रोजी करण्यात आले असून दोन्ही यात्रेचा पाठिंबा पाहता ही यात्रा देखील उत्साहात आणि निर्विघ्न पार पडेल असा विश्वास पै. किरण संपतराव साकोरे यांनी व्यक्त केला.
या जिल्हा परिषद निवडणुकीत प्रथमच मोठ्या प्रमाणावर यात्रेचे आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून हजारो भाविकांनी काशी विश्वेश्वर आणि श्री रामाचे दर्शन घेतले आहे. पेरणे – लोणीकंद जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात आयोजकांचे माध्यमातून रेल्वे स्टेशन पर्यंत मोफत बस चे नियोजन करण्यात येत असल्याने याचा फायदा वयोवृद्ध तसेच महिला व मुलांना होत आहे.

काशी – अयोध्या यात्रेचे माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी, अल्पोपहार, जेवण , राहण्याची सोय तसेच आरोग्य सुविधा देखील किरण साकोरे यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. येणाऱ्या तिसऱ्या टप्यातील यात्रेत देखील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील असा विश्वास किरण साकोरे यांनी व्यक्त केला.





