कोरेगाव भिमा : विशेष प्रतिनिधी
लोणीकंद चे माजी उपसरपंच आणि पेरणे – लोणीकंद गटातील जिल्हा परिषद निवडणुकीचे उमेदवार योगेश झुरुंगे यांच्या माध्यमातून नुकतेच गटातील नागरिकांसाठी नागपूर येथे दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पार्क येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लोणीकंद येथून निघालेल्या या यात्रेत असंख्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सर्वांना अल्पोपहार, राहण्याची – जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारे केली असल्याचे या यात्रेत सहभागी यात्रेकरूंनी भावना व्यक्त केल्या.

दीक्षाभूमी येथे दर्शन घेतल्या नंतर यात्रेकरूंनी ड्रॅगन पार्क येथे जाऊन जल्लोष केला. तुळजापूर – अक्कलकोट – पंढरपूर येथील यात्रा, विद्यार्थ्यांना कात्रज सर्पोद्यान सहल तसेच आता काढलेल्या नागपूर यात्रेतील सुयोग्य नियोजनाचे बद्दल यात्रेकरूंनी माजी उपसरपंच योगेश झुरुंगे आणि नियोजनाचे आभार मानत येणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.





