कोरेगाव भिमा : प्रतिनिधी
दरवषी प्रमाणे या वर्षी देखील कोरेगांव भिमा, ता. शिरूर येथील सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मोठया उत्साहात आणि आनंदामध्ये बाल दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिक्षा लंघे – घुटे यांनी दिली.

बाल दिनानिमित्त विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात तब्बल ७०० विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील सक्रिय सहभाग घेतला होता. विद्यालयातील शिक्षकांनी मुलांसाठी सोशल मीडियावर छान नाटक सादर केले. त्यातून त्यांना मोबाईल पासून दूर रहा असा संदेश त्यांना यातून मिळाला. मोठ्या वर्गातील मुलांनी चित्रकला ऍक्टिव्हिटीआणि फूड ऍक्टिव्हिटी सादर केली. छोट्या गटातील व मोठ्या गटातील मुलांना मंथन परीक्षेबद्दल पदक मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक संजय आप्पा फडतरे उपस्थित होते.

शाळेतील शिक्षिका मायाने मॅडम यांनी सूत्रसंचालन केले व सेलमोकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे घुटे यांच्या मार्गदर्शना खाली सर्व शिक्षकांनी बालदिन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.





