कोरेगाव भिमा : विशेष प्रतिनिधी
लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील उमेदवार लोणीकंद चे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांनी आपल्या गटातील नागरिकांसाठी तुळजापूर – अक्कलकोट – पंढरपूर तीर्थक्षेत्र देवदर्शन यात्रेचे आयोजन केले. या यात्रेमध्ये शेकडो भाविक सहभागी झाले असून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज दि. १५ रोजी सकाळी लोणीकंद येथून अल्पोपहार घेऊन यात्रेला सुरुवात झाली.
यावेळी यात्रा मार्गस्थ करण्यासाठी व भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी उमेदवार योगेश झुरुंगे, सागर झुरुंगे, दीपक झुरुंगे, राजेश झुरुंगे, कुंडलिक झुरुंगे, स्वप्निल झुरुंगे, राजू वाघुले, अजित कोहिनकर, भारत झुरुंगे, हर्ष वानखेडे, नाना देवकर, भाऊसाहेब ठोंबरे, भीमा ठोंबरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
ही तीर्थक्षेत्र यात्रा तुळजापूर येथून भवानी मातेचे दर्शन घेऊन अक्कलकोटला श्री स्वामींचे दर्शन घेऊन रात्रीचा मुक्काम अक्कलकोट मध्ये होणार आहे. तर उद्या दि. १६ रोजी सकाळी पंढरपूर कडे विठ्ठलाच्या दर्शनाला मार्गस्थ होणार आहे. अशी माहिती संयोजकांचे वतीने देण्यात आली.

तसेच लोणीकंद पेरणे गटातील जनतेसाठी योगेश झुरुंगे यांच्या माध्यमातून नागपूर दीक्षाभूमी तसेच ड्रॅगन पॅलेस येथे भाविकांना घेऊन शुक्रवारी रात्रीच शेकडो भाविकांची बस मार्गस्थ झाली. चहा नाश्ता जेवणाची व राहण्याची सुव्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे.
अशा अनेक विविध तीर्थयात्रा इच्छुक उमेदवार योगेश झुरुंगे यांनी आयोजित केले असून या गटातील नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून नागरिक योगेश भाऊ यांचे कौतुक करत आहेत.





