भक्तिमय वातावरणात काशी अयोध्या यात्रा
कोरेगाव भिमा : विशेष प्रतिनिधी
लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी प्रदिप (भाऊ) वसंतराव कंद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या काशी विश्वनाथ-अयोध्या ‘आशिर्वाद’ यात्रेचे दोन टप्पे पार पडले असून तिसरा टप्पा सोमवार (दि.१७) रोजी आयोजित करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्या साठी पेरणेगाव, पेरणे फाटा, रामनगर व वढु खूर्द या भागातील भाविक तिर्थ यात्रेसाठी रवाना होणार असल्याची माहिती प्रदिपभाऊ कंद यांनी दिली आहे.
आत्ता पर्यंत आपल्या ‘आशिर्वाद’ यात्रेचे दोन टप्पे हजारो भाविकांच्या उपस्थितीत, भक्तीभावात व उत्साहात यशस्वी झाले असून तिसरा टप्पा ही यशस्वी होईल असा विश्वास प्रदीप कंद यांनी व्यक्त केला.

तसेच राज्यभरात पावसाळ्यात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गडद झाले असून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कर्जमुक्त व्हावा, यासाठी आपल्या सरकारला शक्ती आणि बुद्धी मिळो, अशी प्रार्थना प्रदीप वसंत कंद यांनी काशी-विश्वेश्वर व प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना अर्पण करत’ आशिर्वाद’ यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास भरभरुन शुभेच्छा दिल्या.





