- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणलोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील मुलांसाठी योगेश झुरुंगे यांच्याकडून विशेष सहलीचे आयोजन

लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील मुलांसाठी योगेश झुरुंगे यांच्याकडून विशेष सहलीचे आयोजन

- Advertisement -spot_img

कोरेगाव भिमा : प्रतिनिधी
एकीकडे पेरणे – लोणीकंद जिल्हा परिषद गटात यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत देवदर्शनाच्या सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच या गटातील इच्छुक उमेदवार लोणीकंद चे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या माध्यमातून गटातील बुर्केगाव येथून लहान मुलांसाठी ‘विशेष सहल’ आयोजित करण्यात आली. कात्रज सर्पोद्यान (राजीव गांधी प्राणी संग्रहालय) येथे घेण्यात आलेल्या या सहलीत विद्यार्थ्यांना निसर्ग, प्राणीविश्व आणि पर्यावरणाची प्रत्यक्ष ओळख करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या योगेश झुरुंगे यांच्या संकल्पनेतून लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील मुलांसाठी ही सहल आयोजित करण्यात आली. योगेश भाऊ झुरुंगे मित्रपरिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या या सहलीत ७० पेक्षा अधिक मुलांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात आपला आनंद व्यक्त केला आणि आयोजकांचे आभार मानले.
सहलीचा शुभारंभ बुर्केगाव चे माजी उपसरपंच दादासाहेब ठोंबरे, माजी चेअरमन बाळासाहेब ठोंबरे, बैलगाडा मालक शंकर ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बाजारे, भिवाजी शिंगटे, जयसिंग ठोंबरे, बबन जांभळकर, गणेश पोकळे, विक्रम ठोंबरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गस्थ करण्यात आली.
लहान मुलांचा आनंद द्विगुणित करण्याच्या हेतूने योगेश झुरुंगे यांनी ही सहल राबविली. या सहलीच्या नियोजनात भाऊसाहेब ठोंबरे, किरण सोनवणे, भिमा ठोंबरे आणि सागर झुरुंगे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.


जनतेच्या सेवेसाठी सदैव पुढाकार घेण्याच्या भूमिकेतून मुलांचा उत्साह पाहून सहलीचे आयोजन केल्याचे सागर झुरुंगे यांनी सांगितले. मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्हाला आनंद झाला असून अशा प्रकारच्या आणखी आठ ते दहा सहलींचे नियोजन सुरु आहे. नागरिकांच्या सूचनेनुसार भविष्यात अशा उपक्रमांची संख्या वाढविणार असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page